चोपड्यात जागृत देवस्थान ॐ सिध्देश्र्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा भव्य सोहळा उत्साहात साजरा.. गुरूवर्य प्रसाद महाराज यांची कळस कसरत ठरली अविस्मरणीय.. दिग्गजांची हजेरीत भाविकांची अलोट गर्दी*

 चोपड्यात जागृत देवस्थान ॐ सिध्देश्र्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा भव्य सोहळा उत्साहात साजरा.. गुरूवर्य प्रसाद महाराज यांची कळस कसरत ठरली अविस्मरणीय.. दिग्गजांची हजेरीत भाविकांची अलोट गर्दी 

 चोपडा,दि.११मार्च ( प्रतिनिधी ) शहरातील महावीर नगरातील जागृत देवस्थान ॐ सिध्देश्र्वर महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रति पंढरपूर ओळख असलेल्या संत सखाराम महाराज संस्थानचे गादीपती गुरूवर्य प्रसाद महाराज यांच्या शुभहस्ते भक्तीमय  वातावरणात पार पडला.५१ फुट उंची असलेल्या शिखरावर तारेवरची कसरत करत कलश व ध्वजारोहण करणाऱ्या प्रसाद महाराजांच्या  धाडसाची   चर्चा सर्वत्र लक्षवेधी ठरली.

यावेळी माजी विधानसभा सभापती अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास बापू पाटील,कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अॕड.संदीपभैय्या पाटील,न.पा.गटनेते जीवनभाऊ चौधरी, चोपडा साखर कारखाना चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी, सामाजिक कार्यकर्ते अजयराजे बाविस्कर, जळगाव महापालिका माजी उपमहापौर डॉ.आश्विनभाऊ शांताराम सोनवणे,प्रताप विद्यामंदिराचे संचालक गोविंदभाई गुजराथी,पं.स.माजी सभापती एम.व्ही.नाना पाटील, वसंतकाका गुजराथी, प्रल्हाद बाविस्करसर, अमळनेर न.पा.माजी नगरसेविका लक्ष्मीबाई प्रल्हाद बाविस्कर, सेनेचे युवा नेते सागरभाऊ ओतारी,महावीर बॅंकेचे माजी चेअरमन शांतीलालजी बोथरासर, सामाजिक कार्यकर्ते महेशभाऊ शर्मा, गुरूदत्त ज्वेलर्सचे चंद्रकांत सोनार, रोटरी क्लब चेअरमन अॕड.रुपेश घन:श्याम पाटील, सुधीरभाऊ चौधरी , आदिवासी सेवक संजीव शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंदिर निर्माण समितीचे मुख्य कार्यवाहक पत्रकार महेश शिरसाठ, संदीप सावळेसर, बांधकाम कॉन्ट्रॅक्टर सोपान मराठे,प्रा.प्रमोद पाटील, रतिलाल बडगुजर, किरण चव्हाण, राजेंद्र यशवंत बडगुजर, अनिल बडगुजर फौजी, फुलचंद चौधरी, भैय्या उर्फ रोहित सोनार,भारत राजपूत, डॉ.रविंद्र बडगुजर, श्याम बडगुजर फौजी, गोपाल मराठे, मोतीराम महाजन,धनराज पाटील,किशोर बडगुजर,अशोक हिरालाल बडगुजर, रामसिंग पाटील, प्रा.पियुष चव्हाण, आकाश मराठे, सुमित सोनार, दिनेश मासरे, आकाश महाजन, गणेश सोनार,  महेश पाटील, आकाश बडगुजर,प्रवीण राजपूत, अनिरूद्ध लोहार,प्रणव राजपूत,शुभम साळुंखे, बापू तायडे,किरण जाधव, साहेबराव महाजन, पंकज पाटील,बापू लोहार,जयेश महाजन, दीपेश पाटील, रविंद्र सोनार,पवन टेलर,छोटू पाटील वायरमन, आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने