चोपडा कृषी तंत्र विद्यालयात यशस्वी खेळाडूंचा सन्मान

 चोपडा कृषी तंत्र विद्यालयात यशस्वी खेळाडूंचा सन्मान


चोपडा,दि.१२ (प्रतिनिधी)महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विद्यापीठ स्तरीय क्रीडा स्पर्धेत घेण्यात आलेल्या खो-खो व हॉलीबॉल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी खेळाडूंचा चोपडा एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरी माधुरीताई मयूर यांच्या हस्ते कृषी दर्शनी देऊन गौरव करण्यात आला..

 जळगाव जिल्हा खो-खो मुले, संघ व हॉलीबॉल मुली हे संघ उपविजेता ठरले. या संघात कृषी तंत्र विद्यालय, चोपडा येथील विद्यार्थी गोविंद बारेला, पवन बारेला व मुलींच्या संघात आरती सपकाळे,सीमा बोरसे व जयवंती बारेला या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संघाला मिळवून दिले. याप्रसंगी संस्थेचे समन्वय गोविंद भाई गुजराथी, डी.टी महाजन,प्राचार्य हरिश्चंद्र पाटील, तेलबिया संशोधन संस्था जळगाव येथील शास्त्रज्ञ प्रा.तुषार बिरारी, प्रा एम जे पाटील, प्रा.मोहन चौधरी प्रा.आर ए चव्हाण, प्रा. चंपालाल पवार, सौरभ गुजराथी व माळी राहुल महाले उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने