चोपड्याची सौ.पूजा बोरा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स परीक्षेत नाशिक विभागातून द्वितीय

 चोपड्याची सौ.पूजा बोरा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स परीक्षेत नाशिक विभागातून द्वितीय  


चोपडा,दि.२४ (प्रतिनिधी) -- दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया तर्फे संपुर्ण भारतभर घेतल्या गेलेल्या डिसेंबर २०२२ परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत याही वर्षी घवघवीत यश संपादन केले आहे. वाणिज्य क्षेत्रात सर्वोत्तम समजल्या सी.एम.ए.(उच्च) परीक्षेतील यशस्वी विध्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. सी.एम.ए. (कॉस्ट अँड मेनेजमेंट अकाउंटंट्) या कोर्सच्या परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परिक्षेसाठी 12 वी नंतरच्या प्रवेश घेणाऱ्या विध्यार्थ्यांना फौंडेशन ही परीक्षा घेण्यात येते.  पुढील इंटरमिजीएट परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरतात. इंटरमिजीएट परीक्षा पास झाल्यानंतर विद्यार्थी फायनलसाठी पात्र होतात. दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया तर्फे डिसेंबर सत्राची परीक्षा जानेवारी मध्ये घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत सी.एम.ए. फायनल परीक्षेला 142 विद्यार्थी बसले होते पैकी अनिल खैरनार हे प्रथम क्रमांकाने व चोपडा येथील सौ. पुजा बोरा या द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे.सौ.पूजा बोरा या चोपडा येथील पदमावती कले्नशनचे संचालक व भारतीय जैन संघटनेचे विद्यमान तालुकाध्यक्ष निर्मलकुमार बोरा यांच्या पत्नी तर चोपडा येथील व्यापारी सुगनचंद बोरा व ललीता बोरा यांच्या स्नुषा आहेत. त्याच्या या यशाबद्दल तालुक्या भरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने