बोरखेडा बु. चे तलाठी व कोतवाल एसीबीच्या जाळ्यात..५ हजारांची लाच पडली महागात

 

बोरखेडा बु. चे तलाठी व कोतवाल एसीबीच्या जाळ्यात..५ हजारांची लाच पडली महागात


जळगाव दि.२३(प्रतिनिधी): चाळीसगाव तालुक्यातील   बोरखेडा बु. येथील तलाठी ज्ञानेश्वर सूर्यभान काळे वय 50 वर्ष यांच्या वतीने कोतवाल किशोर गुलाब चव्हाण बोरखेडा बु. ता चाळीसगाव याना पाच हजाराची लाच स्वीकारताना जळगाव एसीबीने रंगेहात पकडले.

चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा बु. येथील तक्रारदार यांच्या वडिलांनी केलेल्या मृत्युपत्रानुसार संबंधित तक्रारदार यांच्या हिश्यावर एकूण 3 गट वाटणीस आले असून 3 गटांपैकी 64/2 ही शेतजमीन तक्रारदार यांना त्यांची पत्नी प्रतिभा पाटील यांचे नावे करण्याच्या मोबदल्यात बोरखेडा बु. येथील तलाठी ज्ञानेश्वर सूर्यभान काळे वय 50 वर्ष यांच्या वतीने कोतवाल किशोर गुलाब चव्हाण यांनी तक्रारदारास 7000 हजार रुपयाची मागणी केली असता तडजोडी अंती 5000 हजार रु देण्याचे ठरले असता आज दि 23-3-2023 रोजी तलाठ्यासह कोतवालास 5000 रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. असून त्यांचे वर चाळीसगाव पोलीस स्टे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई शशिकांत पाटील पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शन ब्यूरो जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि एन. एन. जाधव, पो.नि संजोग बच्छाव, स. फौ. दिनेशसिंग पाटील, स.फौ. सुरेश पाटील, पो.हे.कॉ. अशोक अहिरे, पो.हे.कॉ. सुनिल पाटील, पो.हे.कॉ. रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो. ना. जनार्दन चौधरी, पो.ना. किशोर महाजन, पो.ना. सुनिल वानखेडे, पो. ना. बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ, पो. कॉ. अमोल सुर्यवंशी, पो.कॉ. प्रणेश ठाकुर आदींनी ही कारवाई केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने