सुंदर प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने हातेड खुर्द येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
चोपडा दि.१८(प्रतिनिधी): आज दि.१८/३/२०२३रोजी हातेड खुर्द येथे आरोग्य शिबिराचे आयोजन गोदावरी फाऊंडेशन व सुंदर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते या शिबिरास जेष्ठ नागरिक श्री पि.के.पाटिल यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले व कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली तर शिबिरास पंचक्रोशीतील व ग्रामस्थांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला .
या शिबिरास अरुणभाई गुजराथी( माजी विधानसभा अध्यक्ष), घनश्याम निंबाजी पाटिल (माजी चेअरमन चो.सा.का.),एस.बि. पाटिल( व्हा चेअरमन चो.सा.का), कैलासबापू पाटील( चेअरमन सुतगिरणी ), घनश्यामभाऊ अग्रवाल (संचालक जे.डि.सी.सी.बॅंक) ,दिलीपराव सोनवणे (माजी आमदार) , गजेंद्र सोनवणे (जि.प.सदस्य),सौ केतकी पाटील (गोदावरी फाऊंडेशन),मनोज सनेर (विक्की डॉक्टर) उपसरपंच हातेड बु!!.), डॉ विवेक जैसवाल (मेडिकल ऑफिसर हातेड ), डॉ राहूल पाटील (मेडिकल ऑफिसर हातेड ) आदी उपस्थित होते .
शिबिरास गोदावरी फाऊंडेशन मार्फतच दोनशे तिस रुग्णांची तपासणी करून गरजू रुग्णांसाठी जळगाव येथे बोलाविण्यात आलेले रुग्णांना गोदावरी फाऊंडेशन च्या वतीने गाडीची व्यवस्था केली आहे तर शिबिर यशस्वीतेसाठी डॉ.विजय बाविस्कर. डॉ.विजय शिरसाठ. डॉ चक्रधर साठे . डॉ अतुल देशमुख तर मा . सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व इतर संस्था चे पदाधिकारी व उद्योजक भुषण बाविस्कर , राहूल सोनवणे इ. ग्रामस्थ ग्रा.प. कर्मचारी यांनी परिश्रम घेतले