गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त अन्नदान वाटप
धरणगाव,दि.१८( प्रतिनिधी)अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्रंबकेश्वर चे पीठधीश परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित धरणगाव च्या वतीने अमरसंस्था संस्था चोपडा संचलित बालक आश्रम मानव सेवा तीर्थ वेले येथे जवळजवळ 800 ते 900 विद्यार्थ्यांना व वृद्धांना मिष्टान्न अन्नदान तसेच वस्त्रादान करण्यात आले.
श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या व कार्याविषयी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र चे तालुका प्रमुख राकेश मकवाने यांनी विद्यार्थ्याना अनमोल असे मार्गदर्शन केले तसेच केजी गुजराती विद्यालय मतिमंद निवासी आणि निवासी विद्यालय धरणगाव येथील विद्यार्थ्यांना फळे पेढे व नारळ पाणी वाटप करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक वाल्मीक पाटील दीपक जाधव व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुकाप्रमुख राकेश मकवाने राजेंद्र पाटील सुलोचना मकवाने वसंत पाटील दिनेश सूर्यवंशी धिरेंद्र पुरभे माधव चौधरी बापू महाजन जगदिश शिंदे चंदा पवार सुनंदा झांबरे चेतन पाटील निलेश जाधव रुपेश राठोड गौरव वाणी श्रद्धा मकवाने, वेदिका मकवाने व सर्वच सेवेकर्यानी परिश्रम घेतले.