पाचोऱ्यात जागतिक महिला दिवस साजरा

 पाचोऱ्यात जागतिक महिला दिवस साजरा

पाचोरा,दि.१५ (प्रतिनिधी)मराठा मावळा प्रतिष्ठान , पाचोरा आणि पाचोरा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने  पोलीस स्टेशन आवारात " जागतिक महिला दिनाच्या" निमित्ताने ,  महिला पोलीस, शासकीय दवाखाना नर्सिंग स्टाफ, नगरपालिका महिला सफाई कर्मचारी , आशा ताई तसेच  पहिली महिला रिक्षा चालक अशा विविध विभागातील नावीन्य पूर्ण  सामाजिक सेवा करणाऱ्या जवळपास १०० महिलाचा सन्मान पत्र, गृहपयोगी भेट वस्तू देऊन, गौरव करण्यात आला

या कार्यक्रम प्रसंगी पोलीस निरीक्षक श्री.राहुल खताळ साहेब,उप निरीक्षक विजया वसावे मॅडम, उप निरीक्षक श्री राहुल मोरे साहेब , मराठा मावळा प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री किशोर बारवकर, कार्यद्यक्षक श्री माधव बोरसे, सचिव - ॲड. दीपक बोरसे पाटील , उपाध्यक्ष श्री. राजेंद्र पाटील, ॲड. ललिता पाटील, ॲड. मनीषा पवार, सौ मंदाताई पाटील, डॉ्.अनुजा देशमुख, सौ. कामिनी पाटील सुष्माताई पाटील ,श्री.प्रदीप पाटील,जय बारवकर,प्रमोद पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संमपण झाला आलेल्या सर्व मान्यवरांचे  मराठा मावळा प्रतिष्ठान चे सचिव ॲड. दिपक बोरसे पाटील यांनी आभार मानले* 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने