सरकारी-निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती मार्फत दुसऱ्या दिवशीही बेमुदत संप
चोपडा दि.१५(प्रतिनिधी): संपूर्ण महाराष्ट्रात 14मार्च 2023 पासून संप सुरु असून संपाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा चोपडा तालुक्यातील सर्व विभागातील सर्व कर्मचारी बंधू भगिनींनी पंचायत समिती कार्यालय चोपडा येथे धरणे आंदोलन साठी उपस्थित आहेत . याठिकाणी उपस्थित संपातील कर्मचारी यांची समन्वय समितीमार्फत काल शासनाने शासन निर्णय काढला तो पेंशन योजनासाठी अभ्यास करण्यासाठी नेमलेली समितीचा निर्णयाची जी आर ची होळी करण्यांत आली.तसेच संपाला होणाऱ्या संपात *जुनी पेंशन मागणी सह, सातवा वेतन अयोग खंड 2 वेतन त्रुटी, मेडिक्लेम, व इतर अनेक आवश्यक मागण्यांचा यात समावेश आहे.*
यावेळी तालुक्यातील सर्व संघटनच्या तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व विविध पदावरील पदाधिकारी यांना आवाहन करण्यात आले की, आपणही आपल्या स्तरावरून संपाबाबत आवाहन करावे. तसेच सर्व कर्मचारी बंधूनी कुठल्याही भीती अथवा दबावाला बळी न पडता संपात सक्रिय सहभाग घ्यावा. राज्यातील क्लास वन ते चतुर्थ श्रेणी मधील 8.5 लाख कर्मचारी तसेच चोपडा तालुक्यातील 700ते 800 कर्मचारी संपात सहभागी आहेत.
संपाच्या दुसऱ्या दिवशी संपाच्या ठिकाणी गटविकास अधिकारी,गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांनी भेट देवून मार्गदर्शन केले.यावेळी समन्वय समिती, चोपडा तालुका सरकारी निमसरकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटने व महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना, जळगाव ने निवेदन दिले.