नाशिक आम आदमी पार्टीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी
नाशिक दि.२०(प्रतिनिधी)दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी पक्षाच्यावतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नाशिक शहरात विविध ठिकाणी साजरी करण्यात आली.
पक्षाचे मुख्य कार्यालय इंदिरानगर येथे सकाळी 11 वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून प्रतिमा पूजन करण्यात आले. तसेच "आप"युवा आघाडीच्या वतीने शंकर काठे गल्ली येथे महाराजांच्या पुतळ्यास हार घालून प्रतिमा पूजन करण्यात आले तसेच रविवार कारंजा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी गिरीश उगले पाटील एडवोकेट प्रभाकर वायचळे योगेश कापसे नासिक निवडणूक समन्वय समिती सदस्य, एडवोकेट अभिजीत गोसावी अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र आप युवा आघाडी, अमर गांगुर्डे अध्यक्ष नाशिक शहर आप युवा आघाडी, श्वेतांबरी आहेर महिला अध्यक्ष पूर्व विधानसभा नाशिक, प्रमोदिनी चव्हाण महिला अध्यक्षा नाशिक शहर, मंजुषा जगताप महिला सचिव नाशिक शहर, गायत्री उगले, निर्मलाताई दाणे,बाळासाहेब बोडके,अनिल कौशिक सचिव मध्य विधानसभा नाशिक, अल्ताफ शेख, नितीन भागवत उपाध्यक्ष नाशिक पूर्व विधानसभा, चंद्रशेखर महानुभाव प्रभाग प्रमुख, चंदन पवार प्रसिद्धीप्रमुख,अमोल लांडगे उपाध्यक्ष नाशिक मध्य विधानसभा, स्वप्निल घिया, साहिल सिंग मीडिया व्यवस्थापक नाशिक रोड देवळाली विधानसभा, प्रदीप लोखंडे, नंदू ठाकरे, प्रकाश कनोजे, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते