शिवजन्मोत्सवानिमित्त आदीवासी विद्यार्थिनींना मोफत वह्या वाटप
नाशिक दि.२०(प्रतिनिधी): येथील नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्यावतीने आज विश्व हिंदू परिषदेच्यावतीने चालवल्या जाणाऱ्या, हरसुल, घोटी आणि मखमलाबाद येथील कन्या छात्रालय, वसतीगृहात जवळपास तीनशे विद्यार्थिनींना पन्नास हजार किमतीच्या, प्रत्येकी मोठ्या सहा वह्या व शैक्षणिक साहित्याचे निःशुल्क वितरण करण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे राम महाजन, कमलेश बिरारी, संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे, उपाध्यक्ष अशोक देशपांडे, मुकुंद रनाळकर, राज्यप्रतिनिधी रविंद्र पाटील, गणेश कोतकर, शिवजन्मोत्सव समिती प्रमुख निलेश दूसे, कार्याध्यक्ष वाल्मीक सानप, कार्यवाह किशोर सपकाळे, निंबाजी राकडे, प्रथमेश राकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. पोवाडे, दोरी मल्लखांब, श्लोक , गीते आदी विविध गुणदर्शनाचे सादरीकरण विद्यार्थ्यिनी़ंकडून करण्यात आले. शहरातील ८० क्लासेससंचालकांनी यासाठी योगदान दिले.