कुरुकवाडे गावात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर व सर्प जनजागृती कार्यक्रम

 कुरुकवाडे गावात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर व सर्प जनजागृती कार्यक्रम





शिंदखेडा,दि.२० (प्रतिनिधी):कुरुकवाडे गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर व नेचर कंजर्वेशन फॉर्म ऑफ दोंडाईचा सर्प जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला . यावेळी  सेवानिवृत्त प्राचार्य डीएन जाधव व सर्पमित्र कल्याण पाटील, सर्पमित्र भूषण कडरे त्यांचे सहकारी मित्र तसेच जनकल्याण ब्लड बँक ऑफ नंदुरबार येथून व्यवस्थापक श्री.आकाश सतिशकुमार जैन, नर्सिंग मॅडम -सोनिया गावित, टेक्निशियन सुपरवायझर-सर मधुसूदन वाघ मारे ,मदतनीस - संजय सूर्यवंशी ,पंचायत समितीचे सदस्य दुल्लभ नाना सोनवणे ,कुरुकवाडे गावाचे पोलीस पाटील उपसरपंच लालचंद पंडित माळी ,ग्रामपंचायत सदस्य मनोज गिरासे माळी ,समाजाचे माजी अध्यक्ष रवींद्र माळी, धनराज माळी ,सतीश जाधव, रमेश मोरे, रवींद्र पाटील, राजपाल गिरासे ,धीरज साळुंखे ,कृपाल गिरासे ,मोहन गिरासे आदी मान्यवर उपस्थित होते .

  सर्पमित्र कल्याण पाटील यांनी शेतकरी बंधूंना   विषारी ,निम विषारी आणि बिनविषारी असे सापांची जाती व त्यांची माहिती शेतकरी बंधूंना सांगितली साप चावल्याने आपण दास्तीने जीव गमावत असतो आपण घाबरायचे नाही आणि योग्य तो उपचार डॉक्टरांकडून सल्ला घेऊन करावा असे सांगून त्यांनी सामाजिक जनजागृती केली तसेच प्राचार्य डी एन जाधव सर यांनी तरुण बांधवांना व ग्रामस्थ मंडळींना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आयोजन  सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विशाल भाऊ माळी यांनी केले होते*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने