प्रताप विद्या मंदिर येथे जागतिक चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न
चोपडा दि.०१(प्रतिनिधी): रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई आयोजित इंटरनॅशनल ड्रॉइंग कॉम्पिटिशनचे उद्घाटन चोपडा एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा माधुरीताई मयूर यांनी चित्र रंगवून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. याप्रसंगी पुणे येथील शिक्षणतज्ञ मा .शुभदा जोशी, मा प्रा.रुबी सप्तर्षी (पुणे),मा. योगीभाई मयूर यांनी विशेष उपस्थिती दिली. या स्पर्धेत बालवर्गापासून ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदविला. या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर निवड झालेले विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धा दुपारी२ ते ५ या वेळेत उत्साहात पार पडली .या स्पर्धेत विविध कलाप्रकार होते. त्यात प्रामुख्याने चित्र रंगविणे ,स्केचिंग, टॅटू, ग्रीटिंग कार्ड बनविणे, फोटोग्राफी, कार्टून, अंगठ्याच्या ठसांपासून , चित्र निर्मिती....यांसारख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. याप्रसंगी संस्थेचे समन्वयक मा गोविंदभाई गुजराथी, मा .डी टी महाजन, मुख्याध्यापक श्री पी एस गुजराथी, उपमुख्याध्यापक श्री एस जी डोंगरे, पर्यवेक्षक श्रीमती .माधुरी पाटील, श्री पी डी पाटील ,श्री एस एस पाटील, उपप्राचार्य श्री जे एस शेलार पी व्ही एम इंग्लिश मीडियम चे प्रिन्सिपल श्री रजिश बी हे उपस्थित होते. या कार्यक्रमात चित्रकला महाविद्यालयातील प्राचार्य श्री राजेंद्र महाजन यांच्या कलेतील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला, तसेच कला स्पर्धांमध्ये विविध पारितोषिके मिळवणाऱ्या ओम उमेश चौधरी या विद्यार्थ्यांच्या देखील सत्कार करण्यात आला. शाळेतील ज्येष्ठ कलाशिक्षक व इव्हेंट डायरेक्टर श्री.पंकज नागपुरे व कलाशिक्षक श्री.कमलेश गायकवाड यांनी या जागतिक स्पर्धेचे आयोजन व नियोजन केलेले होते. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे कलाशिक्षकांनी रंगीत खडूने सजवलेला बोलका फळा, फुलांची अक्षरयुक्त रांगोळी ,निसर्गरम्य वातावरणात स्पर्धा यामुळे कलेतील खरा आनंद विद्यार्थ्यांना व पालकांना अनुभवायला मिळाला. नाविन्यत्या असलेल्या स्पर्धेला सेवानिवृत्त शिक्षक श्री ए पी पाटील , सी.बी.निकुंभ हायस्कूल घोडगाव येथील पर्यवेक्षक श्री वसंत नागपुरे, कलाशिक्षक आर टी सोनवणे, रामकृष्ण सुतार सर, उपक्रमशील शिक्षक श्री संजय बारी, कलाध्यापक संघ चोपडा संघटनेचे सचिव श्री अर्जुन कोळी ,श्री.राकेश विसपुते श्री. कुवर सर, पी व्ही एम इंग्लिश मीडियमच्या शिक्षका तसेच शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचीही उपस्थिती होती.