चोपडा कॉलेजात "युगांतर 2K23'' चे यशस्वी आयोजन
चोपडा दि.०१(प्रतिनिधी) येथील श्रीमती. शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात (पदवी व पदविका पदव्युत्तर ) प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थाचे स्वागत समारंभ व स्नेहांसंमेलन "युगांतर 2K23'' आयोजित करण्यात आलेले होते त्या करिता अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. ॲड . भैयासाहेब संदीप सुरेश पाटील व सचिव ताईसहेब डॉ. स्मिता संदीप पाटील व उपाध्यक्ष श्रीमती आशाताई पाटील उपस्थित होते . सदर कार्यक्रमा अंतर्गत अँटी रॅगिंग कमिटी ची दुसरी सभा आयोजित करण्यात आलेली होती त्या सभेला कमिटी चे वरिष्ठ सभासद मा. श्री. संतोष चव्हाण पोलीस उपनिरीक्षक चोपडा शहर, मा. श्री. सचिन बांगले नायब तहसीलदार चोपडा, श्री. राजेश राजपुत हेड कॉन्स्टेबल चोपडा शहर, सौ.निता राजपुत, पोलिस नाईक चोपडा ग्रामीण हे उपस्थित होते त्यांनी अँटी रॅगिंग संदर्भात विद्यार्थना मोलाचे मार्गदर्शन करून स्नेहसंमेलनाला उपस्थित राहून आनंद द्विगुणीत केला. कार्यक्रमाला पालक प्रतिनिधी म्हणुन श्री राजेश लांडगे व श्री संजय सावंत यांनी उपस्थिती नोंदवली.
महाविद्यालयाचे प्राचार्य . डॉ. गौतम वडनेरे सर यांनी कार्यक्रमाची प्रस्थावना व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. प्रा. डॉ. तन्वीर शेख यांना आदर्शशिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले सोबत प्रा. डॉ. भरत जैन यांची कबैचोउमवि मध्ये फार्मासुटीक्स या विषयाच्या अभ्यास मंडळा वर निवड झाल्या बद्दल गौरविण्यात आले.यांच्या सोबत प्रा. डॉ. मो. रागीब मो.उस्मान यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विद्यार्थ्यांनी phd प्राप्त केल्याबद्दल गौरविण्यात आले. प्रा. डॉ. प्रेरणा जाधव व प्रा. डॉ. रुपाली पाटील यांना phd प्राप्त केल्या बद्दल गौरविण्यात आले तसेच महाविद्यालयाची विद्यार्थिनी तसेच महाविद्यालयाची प्रा. कु. निशा भाट यांना M.Pharmacognosy या विषयात कवयेत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल गौरविण्यात आले. युगांतर २०२३ मध्ये क्रीडा विभागा अंतर्गत क्रिकेट, बुद्धिबळ, कॅरम व बॅडमिंटन या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. संदीप पवार यांनी केले.सदर कार्यक्रमाच्या यशस्विते साठी प्रबंधक, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक ,शिक्षकेतर बंधू भगिनींनी मेहनत घेतली .