चोपडा कन्या विद्यालयात हळदी कुंकू तसेच महिला पालक मेळावा
चोपडा दि०१(प्रतिनिधी) येथील प्राथमिक माध्यमिक कन्या विद्यालय चोपडा येथे मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकू तसेच महिला पालक मेळावा म्हणजेच माता प्रबोधन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमास अध्यक्षस्थानी ताईसो . इंदिराताई भानुदास पाटील तसेच प्रा.डॉ.श्रीमती सविता ताई जाधव यांनी उपस्थिती देऊन आपुलकीचा स्नेह वाढवला तसेच सविताताई जाधव यांनी माता प्रबोधन या विषयावर सर्व महिला पालकांशी अप्रतिम असा संवाद साधला. या प्रसंगी सौ.मयुरी चंद्रकांत पाटील व महिला भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
त्यानंतर हळदी कुंकूचा कार्यक्रम घेऊन भेटवस्तू देण्यात आली . व महिला पालकांसाठी संगीत खुर्ची या खेळाचे आयोजन केले . यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.जी.आर.पाटील. सर माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.पी.एस.पाटील सर यांचे मार्गदर्शन मिळाले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सोनाली पाटील यांनी केले.प्रास्ताविक सौ. विद्या पाटील यांनी केले . तसेच आभार सौ .सुजाता पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले .