दिव्यांगासाठी इलेक्ट्रीकल टायसिकलसह विविध उपक्रमांचे वाटप.. उद्या उप जिल्हा रुग्णालयात नावनोंदणी व तपासणी शिबिर*
चोपडा दि.१५(प्रतिनिधी)सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,भारत सरकार द्वाराखा. श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने भारत सरकारच्या एडीपी योजनेअंतर्गत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनेमोफत वाटपासाठी दिव्यांग बांधवांसाठी मोफत पूर्व तपासणी व नोंदणी शिबीर दि.१६ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी१०वाजे पासूनउपजिल्हा रुग्णालय, चोपडा ता. जि.जळगांव येथे आयोजित करण्यात आले आहे.शिबीराच्या दिवशी फक्त अपंग व कागदपत्रांची तपासणी केली जाईल. त्यानंतर पात्र अपंगांना साधारण एक महिन्यापर्यंत साहित्य वाटप केले जाणार आहे.
ज्यांना सदर योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे. त्यांनी खालील गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
१) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले कमीत कमी ४०% अपंगत्व
असलेबाबतचे प्रमाणपत्र
२) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला वार्षिक २२,५०० रु. चे खालीउत्पन्नाचा दाखला/ उत्पन्नाचे प्रमाणपत्र
३) रहिवास पुरावा म्हणून कौटुंबिक शिधापत्रिका किंवा मतदार ओळखपत्र किंवा आधार कार्ड
४) अपंगत्व दर्शविणारे दोन फोटो
५) बॅटरीवर चालणाऱ्या ट्रायसायकलसाठी ८०% आणि त्यावरील अपंगत्व प्रमाणपत्र आवश्यक आहे. पात्र दिव्यांग बांधवांची शिबिराच्या वेळीतज्ञांकडून तपासणी केली जाईल व निवड केली जाईल. ६) संबंधित व्यक्तीने मागील ३ वर्षात यासाठी कोणताहीलाभ घेतलेला नसावा, वय वर्षे १४ पेक्षा कमी वय असणाऱ्या मुला/मुलींसाठी ही मर्यादा १ वर्ष राहिल,
या शिबिरात दिव्यांगांसाठी व्हीलचेअर फोल्डींग,व्हीलचेअर फोल्डींग चाईल्ड,ट्रायसिकल गतिमान(हात चलित),ट्रायसिकल मोटराईज्ड (बॅटरी चलित), कुबड्या,वॉकींग स्टीक, कोपर कुबड्या,रोलेटर,सी.पी.चेअर, स्मार्टफोन स्क्रीन रिडींग,दृष्टीबाधितांसाठी काठी(रेग्यूलर),दृष्टीबाधितांसाठी काठी(फोल्डींग),ब्रेल किट,ब्रेल स्लेट,कानाची मशीन, कृत्रिम पाय, कृत्रिम हात,कृष्ठरोग बाधितांसाठी कीट,एम.एस.आय.ई.डी.कीट आदि साहित्य वाटप करण्यात येणार आहे.तरी गरजवंतानी शिबिरात नाव नोंदणी करून फॉर्म भरून घ्यावा असे आवाहन तहसील विभाग ,नगरपालिका विभाग व पंचायत समिती आणि आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.