अनवर्दे खुर्द येथे प.पू. हभप.प्रसाद महाराज यांच्या शुभहस्ते विठ्ठल मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा..१८ते २५ फेब्रुवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह
चोपडा दि.१५( प्रतिनिधी): तालुक्यातील अनवर्दे खुर्द येथे दि.१८/०२/२०२३ ते २५/०२/२०२३ दरम्यान नवनिर्वाचित विठ्ठल मंदिरात अखंड हरिनाम किर्तन सप्ताह व श्री विठ्ठल-रुख्मीनी व संत ज्ञानेश्वर महाराज व संत जगद्गुरु तुकाराम महाराज प्राणप्रतिष्ठा सोहळा प.पू.हभप.प्रसाद महाराज अमळनेर यांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आला आहे
या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्यात माघ कृ. १३ महाशिवरात्री दि. १८/२/२०२३ शनिवाररोजी ह.भ.प.शारंधर महाराज वाळी संस्थान (अमळनेरकर),दि. १९/२/२०२३ रविवाररोजी ह.भ.प.लालसिंग महाराज (धावळेकर),दि. २०/२/२०२३, सोमवाररोजी ह.भ.प. शामशास्त्री महाराज (पिंपळगाव),दि.२१/२/२०२३ मंगळवाररोजी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज(कडरे),दि. २२/२/२०२३, बुधवाररोजीह.भ.प. जयवीरसिंग महाराज (कन्हरे),दि.२३/२/२०२३, गुरुवार रोजी ह.भ.प. रविंद्र महाराज ( तारखेळा), दि. २४/२/२०२३, शुक्रवाररोजी ह.भ.प.कोमलसिंग महाराज (खेडी भोकर), याचा सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम होतं आहे.तर दि. २५/२/२०२३. शनिवाररोजी शेवटच्या दिवशी ह.भ.प.सतिष महाराज (निमडाळे) यांचे स. ९ ते ११ काल्याचे किर्तन होणार आहे.
या कार्यक्रमास प. पू. सखाराम महाराज, अमळनेर ,प. पू. ह.भ.प. प्रसादजी महाराज, अमळनेर, वै.ह.भ.प. गुरुवर्य विठ्ठल महाराज चौधरी (मोठेबाबा), ह.भ.प. आधार विठोबा कुमावत आण्णा, पारोळा- हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
तरी कार्यक्रमास गावकऱ्यांनी वा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंदिर आयोजन समितीने केले आहे.