चोपडा दि.१५(प्रतिनिधी): चोपडा तालुक्यात सध्या स्थितीत अल्पवयीन मुलींचा विनयभंग, अपहरण वा पळवून नेण्याच्या घटनेत कमालीची वाढ झाली असल्याने गंभीर समस्या निर्माण होवू पाहत आहे विशेष करुन शैक्षणिक क्षेत्रात विनयभंगाच्या घटना पुढे येऊ लागल्याने पालक वर्ग जबर धास्तावला आहे.एका शाळेतील शिक्षकांच्या पाठोपाठ देवझिरी आश्रम शाळेतील पुरूष अधिक्षक याने तर्र दारूच्या नशेत विद्यार्थींच्या कपडे बदलविण्याच्या रुम गाठत पाठीवर हात फिरवत अश्लीलतेचा कळस गाठत सिनेमातल्या कथानकाला लाजवेल अशी घृणास्पद प्रकार केल्याने विद्यार्थीनींना अक्षरक्ष: आरडाओरडा करत धूम ठोकावी लागल्याने या नशेल्या खलनायकापासून कशीबशी सुटका केली आहे.तरी या अधिक्षकांनवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करून कडक शिक्षा करावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे एव्हढेच नव्हे पालकांची व विद्यार्थींची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न सुरू असून पोलिसांनी कायद्याचा बडगा योग्यरितीने उगारावी अन्यथा शैक्षणिक क्षेत्रात धोक्याची घंटा वाजू पाहत असल्याने आदिवासी संघटना पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरेल असा विविध संघटनांनी दिला आहे. अशा बिभस्त कर्मचाऱ्यांच्या वेळीच नांग्या ठेचा अन्यथा विद्यार्थींचे शैक्षणिक भवितव्यात जहर फोफावत जावून जीवन मरणासन्न होईल अशी भिती पालकांनी व्यक्त केली आहे.
चोपडा तालुक्यातील देवझिरी आश्रम - शाळेतील पुरुष अधीक्षक एस.ए.गडे याने रात्री आठ वाजेच्या सुमारास तर्र दारूच्या नशेत मुलींच्या वस्तीगृहातमध्ये प्रवेश करत कपडे चेंज करण्याच्या रूम गाठत विद्यार्थींनी कपडे बदली करीत असतांना त्यांच्या जवळ जाऊन पोहोचत दहा मिनिटांसाठी माझ्यासोबत चला असे अशलाघ्य लज्जास्पद शब्द बोलून मुलींच्या अंगावर हात फिरवत मुलींना लज्जा उत्पन्न होईल असे शिक्षकी पेशेला काळिमा फसण्याचे कृत्य केले. तरी अशा अधिक्षकांवर गुन्हा दाखल होऊन कडक कारवाई करण्याची मागणी आदिवासी संघटना तर्फे करण्यात आली आहे.
चोपडा तालुक्यातील देवझिरी आश्रम शाळेतील अधीक्षिका अर्चना कोळी मॅडम मुख्यालयी राहतात पण त्या रविवार रोजी काही कारणास्तव बाहेर गेलेल्या होत्या तसेच एकही शिक्षक नव्हते याचा फायदा उठवत सचिन गडे या अधीक्षकाने डाव साधत मुलींच्या चेंजिंग रूम मध्ये दारूच्या नशेत प्रवेश करून मुलींचे कपडे हातात घेऊन लज्जास्पद कृत्य करू लागले. हे पाहून तेथील सर्व मुली घाबरल्या व येथून अधीक्षक यांना बाहेर निघण्यास विनंती करू लागल्या तरी देखील हा अधीक्षक पठठा तेथून जाण्यास तयार नव्हता अशी माहिती मुलींकडून प्राप्त झाली.
"शिक्षकांना आपण गुरु मानतो, जर गुरु असे कृत्य जर शैक्षणिक क्षेत्रात होऊ लागले तर याच्या परिणाम मुलांवर काय होणार"? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आश्रम शाळेत शिक्षक किंवा अधीक्षीका यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक असते. असे असतांना एकही या ठिकाणी मुख्यालयी उपस्थित नव्हते. मुलींच्या सावधगिरीमुळे मोठा अनर्थ टळला.या घटनेची चौकशी करण्याकामी यावल प्रकल्पातर्फे प्रशांत माहुरे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी यावल, सुलताने मॅडम कनिष्ठ विस्तार अधिकारी यावल, हे देवझिरी आश्रम शाळेतपोहोचले. यावेळी आदिवासी संघटना तर्फे निवेदन देण्यात आले. अशा निर्लज्ज शिक्षकावर जर यावल प्रकल्पातर्फे कारवाई न झाल्यास चोपडा येथे रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा संघटने तर्फे देण्यात आला.येत्या दोन दिवसात नाशिक कार्यालयातर्फे यांच्यावर योग्य ती कारवाई करावी तसेच पोलीस विभागातर्फे कडक कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक व आदिवासी संघटनांनी केली आहे.