चोपडा शहरात राहुल एम्पोरियम कापड दुकानाला भीषण आग.. कुटूंबियांना वाचविणारा गौरव जैन याचा हृदयद्रावक मृत्यू

 चोपडा शहरात राहुल एम्पोरियम कापड दुकानाला भीषण आग.. कुटूंबियांना वाचविणारा गौरव जैन याचा हृदयद्रावक मृत्यू 


चोपडा दि.११(प्रतिनिधी महेश शिरसाठ)* : शहरातील मेन रोडवरील राहुल एम्पोरियम  या तीन मजली इमारतीस रात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याने घरातील मंडळींना वाचविण्यात यशस्वी झालेला पण आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करीत असताना घरातील सदस्य गौरव राखेचा हा तरुण  आगीच्या कचाट्यात सापडल्याने  गंभीररीत्या भाजला गेल्याने उपचारा दरम्यान  हृदयद्रावक मृत्यू झाल्याने शहरभर प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आगीत घरातील इतर तीन सदस्य व एक नगर पालिका कर्मचारी देखील गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत . रात्रीची वेळ असल्याने सदर घटना लवकर लक्षात न आल्याने वेळेवर मदत  पोहचू शकली नाही. अग्निशामक दलाने रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणली आहे.

चोपड़ा  शहरातील बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावरील राहुल एम्पोरियम या कापड दुकानाच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यास मध्यरात्री 1 ते 01.30 वाजेच्या सुमारास शॉर्टसर्कीटमुळे भीषण आग लागली. काही क्षणातच या आगीने रौद्ररूप धारण केले. आग लागल्याचे समजताच शहर पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तात्काळ त्याठिकाणी दाखल झाले. मात्र नगरपरिषदेची अग्निशमन यंत्रणेला त्याठिकाणी पोहोचण्यास उशिर झाल्याचे कळाले. ते दाखल झाल्यावर त्यांच्याकडून आग आटोक्यात येत नसल्याचे दिसताच पोलीसांनी वायरलेस यंत्रणेद्वारे कळवून यावल, धरणगाव, पाटोळा, शिरपूर, अमळनेर व जळगांव येथून अग्निशमन दलाच्या गाड्या मागवल्या. त्यानंतर तब्बल साडे चार तासांनी हि आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत या भीषण आगीमुळे गौरव सुरेश राखेचा (जैन) वय 27 या तरुणाचा मृत्यु झाला. व उर्वरित 6 जणांना आगेतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. यावेळी शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अजित सावळे, पोहेकाँ. जितेंद्र सोनवणे, ना. मधुकर पवार, नितिन कापडणे,शुभम पाटील, हेमंत कोळी, हर्षल पाटील आदिंसह इतर पोलीस कर्मचारी यांनी तातडीने बचावकार्य राबविले. त्याबरोबरच चोपडा नगरपरिषद अग्निशमन दलासह यावल, धरणगाव, पारोळा, शिरपूर, अमळनेर व जळगांव येथील दलांनी आग विझविण्यासाठी महत्वाची भुमिका बजावली.  शहरवासियांनी सुद्धा यावेळी धाव घेत बचावकार्यात मदत केली. शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील, प्रविण जैन, पत्रकार लतीष जैन, सचिन सोनवणे, चेतन कानडे, सौरभ नेवे, अमर बोहरा, शिवा पाटील आदिंसह इतर शहरवासियांनी बचावकार्यात मदत केली.

 घटनेचे वृत्त  शहरभर वाऱ्यासारखे पसरल्याने  व्यापारी बांधवांनी कळकळीत बंदचे आवाहन करत शोक व्यक्त केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने