हातेड व चोपडा येथे माता रमाई जयंती साजरी

 हातेड व चोपडा येथे माता रमाई जयंती साजरी


चोपडा दि.१०(प्रतिनिधी)   तालुक्यातील हातेड  येथे भारतीय बौद्ध महासभा यांच्यावतीने त्यागमूर्ती रमाबाई भिमराव आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी करण्यांत आली.    यावेळी माता रमाई यांच्या प्रतिमेचे पुजन निलाबाई वाघ,मिराबाई शिरसाठ यांच्या हस्ते करण्यांत आले.

      सदर कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्रा.आधार पानपाटील हे होते.प्रमुख पाहुणे भरत शिरसाठ (शहराध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा चोपडा),देवानंद वाघ सचिव कास्ट्राईब शिक्षक संघटना ,अनिल पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रघुनाथ पाटील सदस्य ग्रामपंचायत हातेड खु. यांनी स्विकारले.

त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनपटावर व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यात भक्कमपणे सावली प्रमाणे दिलेली साथ या बाबत व्याख्याते प्रा.आधार पानपाटील यांनी मनोगतात सांगितले. यावेळी मेघा अहिरे या विद्यार्थ्यीनीने व भरत शिरसाठ यांनी ही रमाई बाबत मनोगत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमास माजी उपसरपंच वामनदादा,विनायक अहिरे,मार्तंड सपकाळे,यशवंत वाघ,मगन वाघ,सतीलाल वाघ, सुरेश शिरसाठ,रामा शिरसाठ, शालीक सपकाळे,धनराज शिरसाठ,चैत्राम वाघ,विठ्ठल अहिरे व महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.          कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्तविक देवानंद वाघ यांनी केले.

        कार्यक्रम यशस्वीतेसाठी देवानंद शिरसाठ,राजेंद्र अहिरे,बाळू वाघ,पप्पू वाघ,पिंटू शिरसाठ,अनिल शिरसाठ आदिनी परिश्रम घेतले.

*चोपडा येथे रमाई जयंती साजरी*

येथे पंचशिल नगर- भिमनगर, रमाई नगर येथे सुद्धा माता रमाई यांची जयंती साजरी करण्यांत आली.यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक हितेंद्र मोरे,तालुकाध्यक्ष बापूराव वाणे यांनी प्रतिमा पूजन करून मनोगत व्यक्त केले.जयंती कार्यक्रमास बौद्ध उपासक, उपासिका,तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने