माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी हयांच्या शुभहस्ते चोपडा साखर कारखाना निवडणूक प्रचाराचा फुटला नारळ
चोपडा दि१०(प्रतिनिधी)*चोपडा सहकारी साखर कारखाना, चहार्डी येथील सार्वत्रिक निवडणूक २०२२-२७ प्रचाराला हेडगेवार चौकातील पूर्णेश्वराच्या मंदिरात माजी विधानसभा अध्यक्ष श्री.अरुणभाई गुजराथी हयांच्या शुभहस्ते नारळ फोडून शेकडो कार्यकर्त्यांच्या समवेत जल्लोषात सुरुवात झाली.
याप्रसंगी ॲडव्होकेट श्री.संदीपभैय्या पाटील, श्री.घनश्याम अग्रवाल,श्री.प्रवीणभाई गुजराथी चोपडा गटातील उमेदवार श्री.चंद्रहास गुजराथी,श्री.गोपाळ पाटील,श्री.पंडीत रामदास पाटील,श्री.ज्ञानेश्वर भादले, श्री पप्पू भाऊ सोनार चेअरमन MIDC श्री रमेश भाऊ शिंदे नगरसेवक भाजपचे नेते श्री.गजेंद्र जैस्वाल, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते श्री.राजूभाऊ पाटील (बिटवा), नगरसेवकश्री.किशोर चौधरी, श्री. राजूभाऊ देशमुख, हुसेनदादा पठाण, श्री. बाळासाहेब पाटील, महिला मंडळ शाळेचे श्री.आशिष सर, प्रताप विद्या मंदिर शाळेचे श्री.गोविंदभाई गुजराथी, श्री.राजूभाऊ गुजराथी, .श्री.ढबु सर, आडगावचे सरपंच श्री.सुनील पाटील ,आडगावचेश्री.भरत पाटील सर, नगरसेवक मुक्तार सरदार, श्री.प्रशांत भावसार, श्री.सुनील देशमुख,श्री प्रवीण देशमुख,श्री.संजूभाऊ कानडे*इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रचारासाठी जमलेले सर्व कार्यकर्ते व जनसमुदायाची संख्या पाहता विजय निश्चित असल्याची चर्चा जनसामान्यांमध्ये होत आहे.