अडावद नूतन ज्ञान मंदिर विद्यालयात कुष्ठरोग विषयावर निबंध स्पर्धा

अडावद नूतन ज्ञान मंदिर विद्यालयात  कुष्ठरोग विषयावर निबंध स्पर्धा   






चोपडा दि.०५(प्रतिनिधी) लुक्यातुन पाच शाळा पैकी अडावद येथील नुतन ज्ञान मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना... कुष्ठरोग या  विषयावर मार्गदर्शन व  निबंध स्पर्धेतील विषय बाबतीत सविस्तर चर्चा करण्यात आली. 

कुष्ठरोग बाबतीत समाजात ज्या गैरसमज आहे तो कसा दूर करता येईल, हा आजार सम्पूर्ण औषधोपचाराने बरा होणारा असून, आजार सांसर्गिक जरी असला तरी तो आनुवंशिक मात्र मुळीच नाही, त्यामुळे समाजाने घाबरून जाण्याचे कारण नाही, त्याकरिता लोकांनी आधी मनातील भीती दूर करणे गरजेचे आहे, या रोगाचे समूळ उच्चाटन किंवा देशाबाहेर हद्दपार करण्यासाठी याची जनजागृती होणे फार आवश्यक असल्याचे..आरोग्य केंद्रांचे आरोग्य सहाय्यक-विजय देशमुख यांनी उपस्थीत विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शनपर माहिती सांगितली.

याप्रसंगी डॉ.अक्षय पाटील,आरोग्य सहाय्यक-विजय देशमुख, तालुका कुष्ठरोग पर्यवेक्षक-राजेंद्र पाटील,आरोग्य सेवक-विजेन्द्र पवार, अजय भोई, सर्व आशा सेविका, शिक्षक वृंद, उपस्थीत सर्व विद्यार्थी

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने