सागर ओतारी यांचा दणका..! चोपडा शहरात होणार तीन दिवसाआड पाणीपुरवठा...

 

सागर ओतारी यांचा दणका..! चोपडा शहरात होणार तीन दिवसाआड पाणीपुरवठा...


चोपडा, दि.१६(प्रतिनिधी) - पाणी टंचाईची समस्या चोपडा शहरवासीयांच्या पाचवीला पुजलेली आहे. तापी, अनेर, गूळ या जीवनदायीनि नद्या असतांनाही चोपड्यात गेल्या अनेक वर्षांपासून आठ ते पंधरा दिवसाआड पाणी पुरवठा होत होता. मात्र, शहराला समस्यामुक्त करण्याचा संकल्प केलेल्या युवा नेतृत्व सागरभाऊ ओतारी यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी थेट पालिका प्रशासनालाच अल्टिमेटम दिला. सागरभाऊंच्या दणक्या नंतर पालिका प्रशासन हादरले आणि आज पासून चोपडा शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे वेळापत्रक प्रसिद्धीला दिले. चोपडा पालिकेच्या इतिहासात प्रथमच तीन दिवसाआड पाणीपुरवठा होणार असून सागरभाऊ ओतारी यांच्यामुळेच हे शक्य झाल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

आठ ते पंधरा दिवसाआड अनियमित होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे चोपडा शहरातील नागरिक त्रस्त झाले होते. महिला वर्गात याबाबत प्रचंड असंतोष आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्धार सागरभाऊ ओतारी यांनी केला. शहरातील अंतर्गत पाणीपुरवठा यंत्रणेचा अभ्यास करून पालिकेतील लोकप्रतिनिधींची उदासीनता आणि पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा हेच पाणीटंचाईचे कारण असल्याची खात्री झाल्यानंतर जनहितासाठी लढ्याचे रणशिंग सागरभाऊ ओतारी यांनी फुंकले.

मात्तबरांना जे शक्य झाले नाही ते सागरभाऊंना काय शक्य होईल? अशक्य मुद्दे उचलण्यात काय हाशील ? असे प्रश्न प्रस्थापितांकडून उपस्थित करून सागरभाऊंचे मनोधर्य खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, राजकीय यश अपयशाचा विचार न करता ३० जानेवारी रोजी त्यांनी आपल्या निवडक सहकारी आणि भगिनींना सोबत घेऊन मुख्याधिकारी हेमंत निकम यांची भेट घेतली. तीन दिवसाआड पाणी पुरवठा कसा शक्य आहे ते मुख्याधिकारी यांना समजावून सांगितले. आणि तुम्हाला शक्य नसेल तर यंत्रणा आमच्या ताब्यात द्या, आम्ही दोन दिवसाआड पाणीपुरवठा करून दाखवू असेहि ठासून सांगत पालिकेला आठ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा अल्टिमेटम दिला. मुख्याधिकारी हेमंत निकम यांनी पंधरा दिवसांचा अवधी मागितला. त्यानुसार पंधरा दिवस तुमचे मात्र, सोळावा दिवस माझा राहील व त्यानंतर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू आणि पाणीपुरवठ्यातील झारीच्या शुक्राचार्यांना वठणीवर आणू असा इशारा सागरभाऊ ओतारी यांनी दिला होता.  

यानंतर, मुख्याधिकारी हेमंत निकम यांनी तात्काळ पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांची बैठक बोलावून जबाबदारी निश्चित केली. ठेकेदाराला बोलावून काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. शहरांतर्गत पाणीपुरवठा यंत्रणेतील उणिवा दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करून रात्रंदिवस यंत्रणेला कामाला लावले. अखेर स्वप्नपूर्तीचा क्षण आला आणि चोपडा शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे अधिकृत वेळापत्रकच मुख्याधिकारी निकम यांनी आपल्या स्वाक्षरीने प्रसिद्धीला दिले.

.......................................................................

ऐतिहासिक क्षण : चोपडा समस्यां मुक्त करणार !: सागरभाऊ ओतारी (युवा नेतृत्व)

चोपडा शहराच्या इतिहासात प्रथमच तीन दिवसाआड पाणीपुरवठा होणार असून हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा माझा उपहास करणाऱ्या तथाकथित लोकप्रतिनिधींना आज चपराक बसली आहे. चोपडेकर नागरिकांनो, आपल्या मतांचा  जोगवा मागून वर्षानुवर्षे नगरपालिकेत सत्तेत असलेल्या लोकप्रतिनिधींनी आपल्याला मूलभूत हक्कांपासूनच वंचित ठेवले आहे. आपल्या हक्कासाठी आवाज उठविला तर सर्व शक्य आहे, हेच माझ्या या छोट्याशा

प्रयत्नाने सिद्ध झाले आहे. अश्या अनेक समस्यां आहेत ज्या थोड्याशा नियोजनानेही सहज सुटू शकतात. मात्र, इच्छाशक्तीचा अभाव असलेल्या पालिकेतील लोकप्रतिनिधींमुळे आपणही सोशिक बनलो आहेत. आता सहन करायचं नाही, आपल्या हक्कासाठी पेटून उठायचा निर्धार मी केला आहे. गरज आहे ती तुमच्या सोबतीची. न भूतो न भविष्यती अशी पाणी टंचाईची समस्या फक्त एका इशाऱ्यामुळे सुटू शकते तर विचार करा, आपल्या हक्कासाठी तुम्ही साथ देणार असाल तर वर्षानुवर्षांच्या अश्या अनेक समस्यांतून आपली सुटका होईल याची मी खात्री देतो.


  
............................................................

नियमित पाणी पुरवठा होणार ! : हेमंत निकम( मुख्याधिकारी)

पाणीपुरवठा वेळापत्रकाची अंमलबजावणी आणि पाणी  पुरवठ्यासंदर्भात कुठलीही तक्रार असल्यास प्रत्येक विभागाप्रमाणे पाणी पुरवठा कर्मचाऱ्याचे नाव आणि संपर्क क्रमांक वेळापत्रकाच्या शेवटी देण्यात आले आहे. आपापल्या विभागाप्रमाणे नागरिक पालिका कर्मचाऱ्यांशी थेट संपर्क साधू शकतात. चोपडा शहरातील नागरिकांना आता नियमित पाणीपुरवठा होईल.

           ............................................................

सागरभाऊ ओतारी यांचे धन्यवाद : मनीषा लोहार(गृहिणी)

दहा दिवसाआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे शेतात कामाला जाणाऱ्या महिलांना रोजगार बुडवून घरी राहावे लागत होते. पाणी कधी येईल याची खात्री नसल्यामुळे महिलांना नेहमीच चिंता असायची. सागरभाऊंनी आमची समस्यां ओळखली आणि प्रशासनाला दणका दिला. परिणामी आता तीन दिवसाआड पाणी मिळणार असून सागरभाऊंमुळेच हे शक्य झाले असून सर्व महिलांच्यावतीने त्यांचे धन्यवाद.  

..............................................................

प्रस्थापितांना आरसा दाखविणारे युवा नेतृत्व :भटू पाटील सामाजिक कार्यकर्ता





गेल्या अनेक वर्षांपासून चोपडा शहरातील पाणी टंचाईचा विषय ऐरणीवर आहे. मात्र, याकडे कुणीच गांभीर्याने लक्ष दिले नाही. सागरभाऊ ओतारी या युवा नेत्याने नागरिकांच्या जिव्हळ्याच्या मुद्दयाला हात घालून तो तडीस नेला. सागरभाऊंच्या एका दणक्याने तीन दिवसाआड पाणीपुरवठा होणार असून प्रस्तापितांना आरसा दाखविणारे हे कार्य असल्याने या युवा नेत्याला विशेष धन्यवाद आणि शुभेच्छा

.......................................................................

अशक्य ही शक्य झाले...!निरंजना पाटील सामाजिक कार्यकर्त्या

तीन दिवसाआड पाणीपुरवठा होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. सागरभाऊ यांनी महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय हाताळला आहे. चोपड्यातील प्रस्थापित लोकप्रतिनिधी नागरिकांना गृहीत धरीत असून वर्षानुवर्षे नागरी समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. मात्र, तीन दिवासाआड पाणीपुरवठा सुरु करून सागरभाऊंनी अशक्य ही शक्य करता येत असल्याचे सिद्ध केले आहे. चोपड्यातील अनेक समस्या सुटू शकतात याची खात्री सागरभाऊंमुळे झाली आहे.

............................................................................





Post a Comment

थोडे नवीन जरा जुने