बौद्ध स्थळाचे संवर्धन करणे प्रत्येक बौद्धाची जबाबदारी आहे : जयसिंग वाघ
---------------------------------------------------------
निफाड दि.२०(प्रतिनिधी) :- अनेक बौद्ध स्थळ कालौघात नष्ट झाली तर काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत ,आशा पुरातन वा दुर्लक्षित बौद्ध स्थळाचे संवर्धन करणे प्रत्येक बौद्धाची जबाबदारी आहे असे स्पष्ट मत प्रसिद्ध साहित्तीक व विचारवंत जयसिंग वाघ यानी व्यक्त केले .
निफाड़ तालुक्यातील वडगाव भैरव येथील बुद्ध विहाराला जयसिंग वाघ यांनी भेट दिली असता गावातील जनतेला सम्बोधित करतांना जयसिंग वाघ बोलत होते , ते पुढं आपल्या भाषणात म्हणाले की , अवघ्या ७८ वर्षात या विहाराची दयनीय अवस्था झाली , अत्यंत रेखीव , कोरिव , आकर्षक असलेले हे विहार दुर्लक्षित झालेगत आहे ही बाब अतिशय चिंतनीय आहे , या विहाराच्या डागडुजी करीता , रंगरंगोटी करीता आपण गांभीर्यपूर्वक प्रयत्न करावे असे आवाहनही वाघ यांनी केले .
पोलीस निरीक्षक गौतम तायड़े यांनी भगवान बुद्ध यांच्या विचारांचे महत्व विशद करुन या अत्यंत कलाकुसरिने उभारलेल्या विहाराला अधिकाधिक सुशोभित करण्याचा प्रयत्न व्हावा , त्याची अधिकाधिक प्रसिद्धि करावी , विविध कार्यक्रम येथे व्हावे , या करीता स्थानिक जनतेने प्रयत्न करावे , या पवित्र कार्यास लोक जरूर सहकार्य करतील .
बाळासाहेब गांगुरडे यांनी सुरवातीस या विहाराचा इतिहास सांगितला , हे विहार पूर्ण करण्या करीता किमान दहा वर्षे लागली , सम्पूर्ण सागवानी लाकडाचे , अत्यंत कोरिवकाम असलेले हे विहार १९४४ ला पूर्ण झाले , यातील बुद्धमूर्ति थायलंड येथील आहे , विहाराच्या दर्शनी भागावर चार हत्ती , दोन सिंह कोरले आहे , या विहारास बाबासाहेब आम्बेडकर यांनी भेट दिली आहे .
ग्रामपंचायत सदस्य नानाजी गांगूरडे यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले व विहाराच्या सुशोभीकरण करीता जरूर प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले .
भाऊसिंग जाधव , संजय जाधव , प्रशांत जाधव , पंडित गांगूरडे , मोतीराम गांगूरडे , हर्षल गांगूरडे , शंकर गांगूरडे , प्रशांत गांगूरडे , विक्की गांगूरडे , विक्रम गांगूरडे , स्वप्निल जाधव , दादाभाऊ जाधव , संजय जाधव आदिं सह नागरिक मोठ्या संखेने हजर होते .
सुरवातीस बुद्ध वंदना घेण्यात आली , नंतर जयसिंग वाघ , गौतम तायड़े , बाळासाहेब गांगूरडे यांचे स्वागत करण्यात आले .