बौद्ध साहित्य संमेलन नियोजन समिति प्रदेशाध्यक्षपदि मुकुंद सपकाळे

 बौद्ध साहित्य संमेलन नियोजन समिति प्रदेशाध्यक्षपदि मुकुंद सपकाळे 

-------------------------------------------------------


जळगाव दि.२०(प्रतिनिधी):- जळगाव येथे दिनांक २ व ३ एप्रिल रोजी आयोजित ३रे बौद्ध साहित्य संमेलन यशस्वी करण्या करीता जळगाव येथील काही साहित्तीक व कार्यकर्त्यांची बैठक पदमालय विश्रामगृह येथे घेण्यात आली असता संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा भरत शिरसाठ यांनी बौद्ध साहित्य समेलन नियोजन समितीच्या ( सामाजिक व राजकीय विभाग ) प्रदेशाध्यक्ष पदी  महाराष्ट्र जनक्रांति मोर्चा चे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांची निवड केली
.

             प्रा भरत शिरसाठ यांनी संमेलनाची विस्तृत माहिती दिली व संमेलन यशस्वी करण्या करीता शहर , तालुका कार्यकारिणी ची निवड केली , मुकुंद सपकाळे यांच्या कार्याची दखल घेऊन  त्यांची प्रदेश अध्यक्ष पदी निवड करतांना त्यांनी सांगितले की सपकाळे हे सामाजिक , राजकीय , साहित्तीक चळवळीत सक्रिय असून ते उत्तम संघटक आहेत , राज्यात विविध  ठिकाणी होणाऱ्या बौद्ध साहित्य संमेलनाच्या यशस्वीते करीता त्यांचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल . 

             प्रसिद्ध साहित्तीक जयसिंग वाघ यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की संमेलन यशस्वीते करीता सर्वच स्तरात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना एकत्रित केले जावे , सर्वानि जबाबदारीने काम करावे , बौद्ध साहित्य संमेलन जळगाव शहरात प्रथमच होत असल्याने ते यशस्वी करणे आपले कर्तव्य आहे , संमेलनास अधिकाधिक जनता कशी येईल याचे नियोजन व्हावे .

             प्रा हरिश्चंद्र सोनवणे , प्रा सतीश मोरे , प्रा रामभाऊ सोनवणे , विनोद रन्धे  , बाबूराव वाघ , मनोहर गाढे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले .

              सूत्रसंचालन डॉ अशोक सैंदाने  , प्रास्ताविक प्रितलाल पवार , आभार मिलिंद सोनवणे यांनी केले , सभेस युवराज वाघ , समाधान सोनवणे , विवेक सैंदाने , रमेश सोनवणे , सुनील मोरे , राहुल भालेराव , भारत सोनवणे , महेन्द्र केदारे आदि कार्यकर्ते सभेस हजर होते .

        सभेच्या अखेरिस मुकुंद सपकाळे यांचा प्रा भरत शिरसाठ यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला सपकाळे यांनी संमेलन यशस्वीते करीता तन मन धनाने सहकार्य केले जाईल असे सांगितले .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने