राख झालेला संसार पोलीस निरीक्षक सुनील बाबड यांच्या यांच्या प्रयत्नांनी आला रुळावर...
शिंदखेडा दि.२०(प्रतिनिधी): तालुक्यातील भडणे गावात लागलेल्या आगीत जळून पूर्ण पणे राख झालेल्या संसाराला शिंदखेडा शहरातील जैन अलर्ट ग्रुप व शिंदखेडा येथील पोलीस निरीक्षक सुनील बाबड, यांच्या प्रयत्नातून,दोन महिन्याच्या किराणा तसेच कपडे भांडी शाल व पैशांची आर्थिक मदत देऊन रूळावर आणण्यात आला
शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील एका आदिवासी मोल मजुरी करणारा,कालिदास पावरा, या,निराधार पावरा समाजातील कुटुंबांची झोपडी आगीत जळून खाक झाल्याने त्यांचा ससार उघड्यावर होता संपूर्ण कुटुंब झोपडी खास झाल्याने वाऱ्यावर होते याबाबत शिदखेडख पोलीस स्टेशनची पोलीस निरीक्षक माननीय सुनील बाबड यांनी, या गरीब कुटुंबाला काय मदत करता येईल याबाबत शिंदखेडा येथील, जैन अलर्ट ग्रुपच्या सदस्यांशी चर्चा करून, मदतीसाठी पुढे आले यावेळी वर्दीतील देव माणूस, त्यांच्या उदार दार्तृत्वामुळे दिसून आले, शिंदखेडा येथील जैन ग्रुप कडूनकडुन 2 महिने पुरेल इतका कीराणा,संसार उपयोगी भांडी, नवीन कपडे, बाजरी गहू साखर तांदूळ चहा साबण, तेल,ब्लैकेट व लहान मुलांना कपडे,इतर साहित्यांची मदत करण्यात आली प्रसंगी शिंदखेडा येथील,जैन अलर्ट ग्रुप चे कल्पेश जैन,सुमीत जैन, अक्षय बाफना,गिरीष टाटीया, उपस्थित देण्यात आले
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड भडणे येथील जी,प सदस्य धनंजय मगळे अकराशे रुपयाची आर्थिक मदत दिली व जिल्हा परिषद म्हणून काही योजना मिळवण्यासाठी प्रयत्न करणारलोकनियुक्त सरपंच गिरीश पाटील आर्थिक मदत देऊन झोपडी व जागा देण्याचे आश्वासन दिले,माजी सभापती विश्वनाथ पाटील माजी उपसरपंच जगतसिंग गिरासे, दयाराम माळी संजय निकम भोजु गिरासे,विठोबा पाटील सोनू पाटील मुकेश पाटील,प्रशांत पाटील,भडणे येथील, आदर्श पोलीस पाटील युवराज माळी,होते यावेळी निराधार आदिवासी कुटुंबाला एवढा किराणा मिळाल्याबद्दल त्यांचे चेहऱ्यावर आनंद अश्रू दिसून आल्याने त्यांना दिलेली मदत खरच या कुटुंबाला लाख मोलाची आहे,,,,,,,,,,
शिंदखेडा येथील जैन अलर्ट ग्रुप नेहमी अडचणीत सापडलेल्या तसेच गोरगरीब जनतेला, नेहमी मदतीसाठी तत्पर असून या ग्रुप कडून काही मदत करता येईल यासाठी नेहमी ते सर्व सदस्य ग्रुप नेहमी मदतीसाठी धावून जातात दिलेली मदत यामुळे मनाला समाधान वाटते विविध उपक्रम नेहमी ग्रुपच्या माध्यमातून तालुक्यात करण्यात येतात,सुमित जैन अलर्ट ग्रुप शिंदखेडाव दुष्काळी परिस्थितीत पाण्यासाठी नेहमी मदत करतात, त्यांच्या या कामगिरी बजावल्याबद्दल जैन अलर्ट ग्रुप सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे