जनता हायस्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

 जनता हायस्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

 शिंदखेडा दि.२०(प्रतिनिधी): येथील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली* 

    *कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री मनोहर गोरख पाटील यांच्या शुभ हस्ते महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी संस्था उपाध्यक्ष श्री अमजद मेहमूद कुरेशी खजिनदार देवेंद्र पोपटराव बोरसे संस्था सचिव श्रीमती मीरा मनोहर पाटील संचालक प्रा श्री जितेंद्र पाटील प्राचार्य श्रीमती एम.डी.बोरसे पर्यवेक्षक श्री उमेश देसले ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एस एस बैसाने श्रीमती एस एस पाटील श्री डी के सोनवणे वरिष्ठ लिपिक श्री किशोर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते* 

  *कार्यक्रमाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित नाटिका, समूहगीत, तसेच पाळणा गीत व महाराजांच्या चरित्रावर आधारित भाषणे सादर करण्यात आली विद्यार्थ्यांकडून मी शिवाजी राजे भोसले हे लघुनाटक सदरीकरण करण्यात आले.* * 

  *छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन परिचय व त्यांनी केलेल्या कार्याचा परिचय श्री एस ए पाटील यांनी आपल्या मनोगतातून करून दिला.* 

         *कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस ए पाटील तर मान्यवरांचे आभार श्री ए.टी.पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती एन.जे.देसले ,श्रीमती व्ही एच पाटील श्रीमती पी यु पवार श्रीमती पल्लवी पवार श्रीमती ए.पी.बेहरे ,श्री दशरथ धनगर ,मनोज मराठे ,श्री मनीष माळी श्री अमोल देसले यांनी प्रयत्न केले.*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने