महाशिवरात्रीच्या महापर्वावर महाप्रसाद वाटप

 महाशिवरात्रीच्या महापर्वावर महाप्रसाद वाटप






शिरपूर दि.२०(प्रतिनिधी):   महाशिवरात्री निमित्त शिरपुर शहरात करवंद नाका येथे दरवर्षी प्रमाणे भगवान महादेवाची  विधीवत पुजा व महाआरती आणि महाप्रसाद वाटप करण्यात आले भगवान महादेवाची आरती शिरपुर तालुक्याचे लोकप्रिय आमदार काशिरामदादा पावरा, यांचा हस्ते करण्यात आली व महाप्रसादाचे वाटप भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा हस्ते करण्यात आली या प्रसंगी  ह.भ.प.प्रमोद महाराज भोंगे, महंत सतिष महाराज भोंगे यांनी विधिवत पुजा करवुन घेतली . 

महाआरतीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी शिरपुर तालुक्याचे समस्त टाळकरी,माळकरी,वारकरी,एकतारी व परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते 

कार्यक्रमाचे आयोजन केतन पंडित, राहुल पंडित, गौरंग अग्रवाल, पुष्पक जैन, ऋषिकेश सनेर, विपुल बोरगावकर,धनजंय पाटील ,दादू चौधरी, रोहित साळुंखे,रोहित धमाणी, देशपाल निकुंबे, भुषण अग्रवाल, प्रकाश मिना, भरत पोटे, मोहित शर्मा, कैलास शिदें ,सुनिल मगरे ,भावेश पाटील, हितेश माळी, चेतन राजपुत, निखिल सुर्यवंशी, मयुर भावसार ,प्रसाद पाटील, सुमित अंबुरे ,वैभव राजुरकर, यांचा या कार्यक्रमाला सहकार्य लाभला

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने