गुरूंच्या सेवानिवृत्तीला शिष्यांकडून कृतज्ञता सोहळा संघ स्थापून सुरू केली शिष्यवृत्ती
गणपूर,ता चोपडा;दि.५(प्रतिनिधी): ज्या गुरूंनी शिकवलं,घडवलं,आणि त्यातुन पुढे जीवनाला आधार आणि गती मिळाली.त्या गुरूंच्या सेवानिवृत्तीला माजी व आजी विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थी महासंघ स्थागुरूंच्या सेवानिवृत्तीला शिष्यांकडून कृतज्ञता सोहळा,संघ स्थापून सुरू केली शिष्यवृत्ती सुरू करून गुरूंचा कृतज्ञता सोहळा मोठ्या थाटात साजरा केला ,त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवून गुरूंच्या नावे शिष्यवृत्तीही सुरू केली. होय ,ही गुरुवंदना चोपडा शहरातील भगिनी मंडळ संचालित ललित कला केंद्र महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र महाजन यांच्या सेवानिवृत्तीला त्यांच्या माजी विद्यार्थ्यांनी केली आहे.
संस्थेच्या मल्टिपर्पज सभागृहात स्क्रीनवर गुरूंवर तयार केलेली चित्रफीत दाखवत सत्कार करून पार पडलेल्या या कार्यक्रमाला अध्यक्ष होते उद्योगपती आशिष गुजराथी.आणि प्रमुख पाहुणे होते माजी कला संचालक प्रा. विश्वनाथ साबळे,माजी निरीक्षक (चित्र व शिल्प )भास्करराव तिखे,महा कॅटना, मुंबई चे अध्यक्ष सुरेंद्र जगताप राज्य कला शिक्षक संघाचे सरचिटणीस एस डी भिरुड,संस्थाध्यक्षा पूनमबेन गुजराथी व अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. माजी कला संचालक साबळे यांनी प्राचार्य महाजन यांच्या कर्तृत्वाची प्रतिमा त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये दिसते तर उद्योगपती आशिष गुजराथी यांनी कला संस्थेला स्थापने पासून मेहनत घेत मोठे केल्याचा उल्लेख केला . एस डी भिरुड,मिलिंद विचारे,चित्रकार पिसर्वो,सुरेंद्र जगताप,डी जे पाटील व प्राचार्य राजेन्द्र महाजन व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक निरंजन शेलार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बारी यांनी व उपस्थितांचे आभार प्रमोद महाजन यांनी मानले. कृतज्ञता सोहळ्याला कला क्षेत्रातील चित्रकार,शिल्पकार व कलाप्रेमी,शिक्षक उपस्थित होते........