*सौ. सुमनताई गि.पाटील माध्यमिक विद्यालय व सौ जयश्री ग पूर्णपत्री कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १२वी वर्गातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
भडगाव दि.०५(प्रतिनिधी):पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ सुमनताई गि पाटील माध्यमिक विद्यालय व सौ जयश्री ग पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय, भडगाव येथे इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्याना निरोप देण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी *शालेय समितीचे चेअरमन आबासाहेब दत्तात्रय पवार होते तर प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून किमान कौशल्य विभागाचे चेअरमन नानासाहेब विजय देशपांडे होते. व्यासपीठावर सौ. जयश्रीताई पूर्णपात्री, प्राचार्य विश्वासराव साळुंखे, उपप्राचार्य संदीप सोनवणे, उपमुख्याध्यापक के.एस.पाटील, पर्यवेक्षक अरुण पाटील, किमान कौशल्य प्रमुख किरण पाटील* उपस्थित होते.
व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य संदीप सोनवणे* यांनी केले.
विद्यार्थी मनोगतात इ12वी वर्गातील भटाबाई पाटील, रोशनी घोडके या मुलींनी मनोगत व्यक्त केले तर शिक्षकांमधून श्रीमती एम.एन.विळस्कर व उपमुख्याध्यापक के एस पाटील* यांनी मनोगत व्यक्त केले. *प्राचार्य/ मुख्याध्यापक विश्वासराव साळुंखे* यांनी आपल्या मनोगतातुन विद्यार्थ्यांना बदललेली परीक्षा पद्धती विषयी माहिती दिली
प्रमुख वक्ते विजय देशपांडे यांनीआपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष देऊन यश मिळवावे व वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती करावी याविषयी माहिती दिली.सौ जयश्रीताई पूर्णपत्री यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष आबासाहेब दत्तात्रय पवार होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा पाटील तर आभार प्रदर्शन एस.आर. झंवर* यांनी केले कार्यक्रम यशस्वीहोणेसाठी शिक्षक व शिक्षकेतर बंधू- भगिनींनी सहकार्य केले.