पत्रकार दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात फळवाटप व कोरोना योद्धा प्रशांत पाटील यांचा सत्कार
चोपडा,दि.०९ (प्रतिनिधी ) ०६ जानेवारी २०२३ रोजी पत्रकार दिनानिमित्त चोपडा येथील शासकीय विश्रामगृह येथे स्वराज्य पोलिस मिञ पञकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेतर्फे आचार्य बाळशास्ञी जांभेकर यांच्या प्रतिमेस माल्यर्पण करून पत्रकार हेमकांत गायकवाड यांच्या हस्ते मानवंदना देण्यात आली व उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
रुग्णालय स्ञी कक्ष, पुरुष कक्ष,अपघात कक्ष या ठिकाणी कार्यरत असलेले आरोग्यसेविका,कर्मचारी वर्ग या सर्वांना आणि ६५ रुग्णांना व फळ वाटप करण्यात येऊन कोरोना काळात प्रदीर्घ सेवा जनसेवा बजावणाऱ्या प्रशांत पाटील उर्फ मामु यांना कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला यावेळी हेमकांत गायकवाड,विनायक पाटील,सुनील पावरा,रवींद्र कोळी,मन्सूर तडवी,समाधान कोळी,मिलिंद वाणी व इतर सामाजिक कार्यकर्ते बाळू कोळी,समाधान बाविस्कर उपस्थित होते.