कामापुरती आस्था,भवानी माता मंदिराची दुरावस्था
चोपडा :सध्या सर्वीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच विषय जास्त येतोय तो म्हणजे महाराष्ट्राचे आद्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा कुठे एकेरी शब्दात होणारा उल्लेख,त्यांची प्रतिमा देतांना पायात असलेले बुट तर कधी छत्रपती शंभू राजेंबाबत धर्मवीर व धर्मरक्षक या सापेक्ष शब्दांवरून एकमेकांवर होणारी चिखल फेक.सध्या तरी महाराष्ट्रात याच विषयावर राजकारण तापतय पण खरच सर्व पक्षीय प्रतिनीधींना महाराजांबद्दल आदर आहे का? का नुसतं चिखल फेक करत टाईम पास करायचा आहे.महाराजांच्या नावाचा वापर फक्त आणि फक्त आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी केला जातोय.महाराष्ट्रात
महाराजांचे नाव घेतल्या शिवाय येथे यांच्या भाषणाला सुरूवात होत नाही.यांचं राजकारणाचं दुकान चालत नाही त्याच महाराजांच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेल्या खांदेशातील जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील चौगावच्या किल्ल्यावर राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या व पुरोगामी महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी आई भवानीचे मंदीर गेल्या सत्तर ते पंचाहत्तर वर्षापासून पडलेल्या अवस्थेत आहे.आई भवानीच्या मंदिराची अक्षरश:विटंबना होत आहे.याकडे स्वत:ला शिवछत्रपतींचे मावळे समजणार्या एकही प्रतिनीधींचे लक्ष नसणं ,सत्तर वर्षात आई भवानीच्या मंदिराचा जिर्णोद्धार न होणं ,तिथपर्यंत कधीच न पोहचणं किंवा त्या मंदिरापर्यंत रस्ता ,लाईट व पाण्याची व्यवस्था न होणं यासारथी दुसरी शोकांतिका काय राहू शकते? धर्मवीर व धर्मरक्षक वरून महाराष्ट्रभर तांडव करणारे ह्या विषयावर का बोलत नाहीत? आणि जर ह्या विषयावर कुणी बोलत नसतील ,विजयगड हा जळगाव जिल्ह्यातील दुर्ग प्रकारातील एकमेव सुस्थीतीत असणार्या किल्ल्याची महाराष्ट्र राज्य संरक्षीत किल्ल्यांमध्ये समाविष्ठ करू शकत नसतील तर जय भवानी -जय शिवराय,जय जिजाऊ-जय शंभूराजे हे पवित्र शब्द उच्चारून अपवित्र बनवू नये.त्यांच्या पवित्र नावांचा आपल्या फालतू राजकारणासाठी कुणीही वापर करू नये.जर हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न म्हणजे येणार्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती पर्यंत मार्गी लागत नसेल तर अशा राजेंवरील बेगळी प्रेम दाखवणार्यांनी येणार्या शिवजयंतीला शिवजयंतीचा देखावा करू नये त्यांना तो नैतिक अधिकारही नाहीच.दोन वर्षापुर्वी महाराजांचे तेरावे वंशज विशाल राजे भोसले या किल्ल्यावर येऊन गेलेत.मंदिराची अवस्था पासून राजे ढसाढसा रडलेत.तरी पण स्वत:ला मावळे समजणार्या कुंभकर्णी लोकप्रतीनीधींना फरक पडला नाही .आणि असे शिवप्रेमी मावळे या पडलेल्या आई भवानीच्या मंदिरा पर्यंत पोहचू नयेत व महाराष्ट्रात बदणामी होऊ नये म्हणून सत्तर वर्षात या किल्ल्याला रस्ताही न होऊ देणं हे राजकीय षडयंत्रच असावे असा सूर आता शिवप्रेमींमध्ये उमटू लागला आहे.
विश्राम तेले
जिल्हाध्यक्ष- छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान जळगाव
कार्याध्यक्ष-राजा शिवछत्रपती परीवार जळगाव
संपर्कप्रमुख-टिम खांदेश एक्सप्लोअर