सत्रासेन येथे अभाविप तर्फे चित्रकला स्पर्धा
चोपडा दि.०८(प्रतिनिधी)-येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चोपडा शाखेच्यावतीने डी.आर.बी. महाविद्यालय ,सत्रासेन येथे बालिका दिवसानिमित्त चित्रकला स्पर्धा राबवली गेली . स्पर्धेत पाचवी ते बारावीच्या विद्यार्थीनींनी सहभाग घेतला.प्रारंभी स्वामी विवेकानंद, विद्याची देवता सरस्वती मातेच पूजन करुन स्पर्धेचा आरंभ झाला.
स्पर्धेमध्ये ५०० पेक्षा जास्त विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला होता. ५-८ च्या गटासाठी चित्रात रंग भरण्याची स्पर्धा ठेवली गेली व ९-१२ च्या विद्यार्थीनींसाठी चित्र काढण्याची स्पर्धा आयोजित या प्रसंगी झाली.या स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय याची निवड करण्यात आली. बक्षिस वितरण सोहळ्याच्या वेळी महाविद्यालयाचे अध्यक्ष रवींद्र भादले,सचिव ज्ञानेश्वर भादले, प्राचार्या वंदना भादले,जेष्ठ शिक्षक जगदीश महाजन,बी.एस.पवार,मनोज पाटील, योगेश पाटील,गजानंद पाटील यांचेसह शिक्षक ही उपस्थित होते.परिषदेच गीत गाऊन बक्षिस वितरण सोहळ्याला सुरवात झाली. त्यामध्ये अभाविप चोपडा शाखेचे शहर मंत्री हर्षल पाटिल यांनी अभाविपच्या कार्याबद्दल व विद्यार्थी परिषदेची थोडक्यात ओळख दिली तसेच स्पर्धेचा उद्देश विषद केला.