पत्रकार दिनानिमित्त प्रेरणा दर्पण फाऊंडेशनतर्फे वारांगणांची आरोग्य तपासणी संपन्न

 पत्रकार दिनानिमित्त प्रेरणा दर्पण फाऊंडेशनतर्फे वारांगणांची आरोग्य तपासणी संपन्न 


चोपडा,दि.०८ ( वार्ताहर ) - येथील प्रेरणा दर्पण फाऊंडेशन, जनशिक्षण संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.६ जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधत जळगाव येथील गोदावरी फाऊंडेशनच्या वैद्यकीय पथकामार्फत शहरातील देहविक्रय करणाऱ्या महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन या दुर्लक्षित वारांगणांना पुढील उपचार विनामूल्य करणार असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.

 पत्रकारदिनी आगळा वेगळा पण समाजाभिमुक कार्यक्रम राबवत येथील प्रेरणा दर्पण फाऊंडेशन व जनशिक्षण संस्थान यांनी एक वेगळा पायंडा घालून दिला आहे.व्हाईट कॉलर समाज जो या देहविक्रय करणाऱ्या या घटकांना हीनभावनेने बघतो,त्यांच्या पर्यंत प्रेरणा दर्पण पोचली आहे. जवळपास पन्नास महिलांची यावेळी आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्यांना योग्य तो सल्ला देण्यात आला.

आरोग्य शिबिरासाठी संस्थेचे अध्यक्ष शाम जाधव,उपाध्यक्ष डॉ.निर्मल टाटीया,सचिव लतीश जैन,जनशिक्षण संस्थानचे संचालक रवींद्र कुडाळकर,हिरेंद्र साळी,निलेश जाधव,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील,संतोष अहिरे,शशिकांत साळुंखे आदींनी परिश्रम घेतले.शिबिरासाठी गोदावरी फाऊंडेशनचे डॉ.अभिषेक चोपकर,डॉ.यश पाटील,डॉ.श्वेता गाडवे, डॉ.कमलेश गुप्ता,सईद वाशीद यांनी सर्व महिलांची आरोग्य तपासणी केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने