*चोपडा दि.०९(प्रतिनिधी ):* जळगाव जिल्हा राज्य शासकिय कर्मचारी सहकारी पतपेढीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत चोपडा तहसील कार्यालयातील धडाकेबाज कर्तव्य दक्ष प्रभारी नायब तहसीलदार श्री.रविंद्र माळी हे संचालक पदी बहुमताने निवडून आले आहेत.
श्री.रविंद्र माळी हे शांत,सुसंयमी मितस्वभावी असून स्नेही जणांचा मेळा वाढविणारे आहेत.सोबत कर्तव्य दक्ष धडाकेबाज निडर अधिकारी म्हणून त्यांचा कार्याचा महसूल विभागात दबदबा आहे त्यांनी आपल्या स्नेहाच्या जोरावर जळगाव जिल्हा राज्य शासकिय कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत बहुमताने आघाडी घेत संचालक पदाची माळ गळ्यात घातली आहे.
उपरोक्त निवडीबद्दल त्यांचे सुरेश पाठकसर, पत्रकार महेश शिरसाठ, श्री.देवांगसर, संदीप सावळेसर,रतिलाल बडगुजर, डॉ.रविंद्र बडगुजर, सोपान मराठे,प्रा.पियुष चव्हाण, प्रकाश चौधरी,आकाश मराठे, योगेश चौधरी, प्रमोद पाटील सर, श्री.राठीसर,शहर मंडळ अधिकारी मनोज साळुंखे, शहर तलाठी दीपक महाजन , आत्माराम महाजन आदींनी अभिनंदन केले आहे.
राज्य शासकीय कर्मचारी पतपेढीच्या संचालक मंडळासाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत एकता पॅनलचे उर्वरित सातही उमेदवार अपेक्षेप्रमाणे विजयी झाले. १२६८ पैकी ६३७ सभासदांनी (५८.२९ टक्के) मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीत एकता पॅनलचे ७ विरुद्ध दोन अपक्ष असे ९ उमेदवार रिंगणात होते. यापूर्वीच महिला राखीव व ओबीसी या दोन घटकातील एकता पॅनलचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
रवींद्र विजय गायकवाड यांनी भटक्या विमुक्त जाती व जनरल या दोन गटातून व भरत किसनराव वाकचौरे यांनी जनरल मधून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती.
*एकता पॅनलचे उर्वरित विजयी उमेदवार* भटक्या विमुक्त जाती : मयूर चंदनकर(५९७), जनरल भारत दत्तू बारी (५२९ ), रामदास बारी (५२७), वसंत श्रीकृष्ण काळकर (५२८), केशव मराठे (५३६), रवींद्र भगवान माळी (५२४), मोहनदास पाटील (५२५).
*अपक्ष उमेदवार* : भटक्या विमुक्त जाती :- रवींद्र विजय गायकवाड (९८). जनरल :- रवींद्र विजय गायकवाड (६३), भरत किसनराव वाकचौरे (३०७).
आदिवासी विकास विभाग कर्मचारी पतसंस्था निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे ६ उमेदवार तर सहकार पॅनलचे पाच उमेदवार निवडुन आले. ६६४ पैकी ५९१ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. विजयी उमेदवार असे. सर्वसाधारण . मतदारसंघ - लिलाधर पाटील (सहकार), मनोज ठाकरे (सहकार), मनेश तडवी (परिवर्तन), संभाजी पाटील (परिवर्तन), मनोज पिंगळे (सहकार), विनोद पाटील (परिवर्तन). महिला राखीव- अलका सरदार (सहकार), रचना पाटील (परिवर्तन). इतर मागासवर्गीय- अविनाश शिवरामे (परिवर्तन). अनु. जाती/जमाती- प्रशांत बोदवडे (सहकार ) . विजा - विलास भोई ( परिवर्तन). अपक्ष- किशोर महाजन भाईदास पवार
*बिनविरोध....* एकता पॅनलतर्फे महिला राखीव व ओबीसी गट या दोन घटकांतील प्रत्येकी दोन असे चौघे, महिला राखीवमधून शोभा डिगंबर जाधव, ज्योती विलास भोळे तर ओबीसी घटकांतून संतोष वसंत चौधरी हे बिनविरोध झाले.