२८ वर्षाच्या खडतर प्रवासानंतर भारतीय थलसेना सुभेदार निलेश बोरसे सेवानिवृत्त

  २८ वर्षाच्या खडतर प्रवासानंतर भारतीय थलसेना सुभेदार निलेश  बोरसे   सेवानिवृत्त


चोपडा दि.०९(प्रतिनिधी):   तालुक्यातील अनवर्दे खु येथिल रहिवासी ह. मु. 17 , अनंत नगर चोपडा । जि जळगाव . सुभेदार श्री निलेश उमराव बोरसे ( अनवर्दे खु .ता . चोपडा) हे भारतीय थलसेना ( Indian Army) च्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट मधून 28 वर्ष प्रदिर्घ सेवा अगदि खडतर व संघर्षमय प्रवास सुरळीतपणे पूर्ण करून सेवा निवृत्त होऊन आपल्या घरी कर्मभूमीतून मायभूमीत सुखरूप पोहचले आहेत


त्यांनी आपल्या 28 वर्षाला सेवाकाळात देशात अनेक ठिकाणी तथा परदेशात हि सेवा बजावली आहे . जसे की देशांतर्गत : जम्मू काश्मिर , सियाचिन ग्लेशीयर , आसाम , बंगाल , अरुणाचल प्रदेश , त्रिपूरा, सिक्कीम , मध्य प्रदेश , उत्तर प्रदेश , पंजाब , हरियाणा , राजस्थान, उत्तराखंड , हिमाचल प्रदेश , कर्नाटक , केरळ , इत्यादि  राज्यात सेवा बजावली आहे व देशा बाहेर परदेशात : . साउथ सुदान ( United Nations Mission in south sudan) Peace Keeping Force ( शांती सेना) व भुटान ( joint Trg with Bhutan Army) या देशांत देखिल सेवा दिलेली आहे . दि. 1 जानेवारी 2023 रोजी सेवा निवृत्ती घेऊन सुभेदार निलेश उमराव बोरसे (पाटील) सुखरूप आपल्या मायदेशी घरी पोहचले आहेत सर्व मित्रपरीवार नातेवाईक व नागरिकांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले आहे . 🇮🇳🇮🇳🇮🇳

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने