सनपुले ग्रा.प.च्या सरपंच पदी पुंजू कोळी तर उपसरपंच पदी समाधान पाटील यांची बिनविरोध निवड

 

*सनपुले ग्रा.प.च्या सरपंच पदी पुंजू कोळी तर उपसरपंच पदी समाधान पाटील यांची बिनविरोध निवड

चोपडा  दि.३(प्रतिनिधी)- तालुक्यात नुकत्याच ग्रामपंचायत च्या निवडणुका पार पडल्या त्यात सनपुले ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच पदी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार श्री पुंजू अर्जुन कोळी यांची बिनविरोध निवड झाली होती त्या अनुशंगाने  आज दि. ३ जानेवारी २०२३ रोजी त्यांनी आपल्या सरपंच पदाचा कार्यभार स्विकारला तसेच   उपसरपंच पदासाठी समाधान लक्ष्मण पाटिल यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणुक निर्णय अधिकारी श्री. एस. आर. धनगर(-एकात्मीक बालविकास प्रकल्प अधिकारी प. स. चोपडा) यांनी   उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर केले.

या निवड प्रसंगी सर्व नवनियुक्त ग्रा०प० सदस्य श्री साहेबराव महादू कोळी, सौ. कमलबाई दौलत पाटील, श्री. राकेश नामदेव भिल, सौ. उषाबाई छोटू पाटील श्री. बाळू रामचंद्र मोरे, सौ. मिराबाई सुरेश कोळी, सौ. निर्मला बाई बापू पाटील, हे सदस्य हजर होते, याशिवाय
अँड. शिवराज संभाजी पाटील, मा.ग्रा.प. सदस्य शोभाबाई नामदेव भिल, छोटू माधव पाटील,
शांताराम सोमा कोळी, भगवान दौलत पाटील, विनोद प्रताप पाटिल, ज्ञानेश्वर युवराज मोरे, पांडूरंग नारायण कोळी, सुनिल योगराज भिल, सुरेश पुंडलिक कोळी, गजानन आनंदा भिल, महेंद्र प्रेमलाल पाटील, मनोज गुलाब पाटील, बापू जुलाल भिल,  राजेंद्र पुंडलिक भिल, सुरेश पाटील (मामा), बापू नारायण पाटील, लक्ष्मण जगन्नाथ पाटील, दिनेश रमेश कोळी आदि ग्रामस्थ हजर होते.

या निवड प्रक्रियेसाठी ग्रामसेवक संदिप पाटील, पा.पू. कर्मचारी - काशिनाथ पवार, संगणक परिचालक नंदकिशोर पाटील, पोलीस पाटील - वंदनाबाई मोरे, सफाई कर्मचारी विजय मांग यांचे अनमोल सहकार्य लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने