चोपडा येथे शौर्य दिवस साजरा
चोपडा दि.०३(प्रतिनिधी) दि.बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा चोपडा तसेच तालुका शाखा चोपडा यांच्या वतीने *समता सैनिक दला तर्फे दि.१जानेवारी२०२३ रोजी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुतळा चौक चोपडा येथे भिमा कोरेगांव येथील युद्धातील शुर सैनिकांना सलामी व मानवंदना देवून *"शौर्यदिवस" * साजरा करून विजयी स्तंभास अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यांत आला.या प्रसंगी प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार तालुकाध्यक्ष बापूराव वाणे व शहराध्यक्ष भरत भिमराव शिरसाठ यांनी अर्पण करून त्रिशरण ,पंचशील, बुद्धवंदना,भिमस्मृती ग्रहण केली. व जनरल सलामी दिली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार जिल्हा संघटक हितेंद्र मोरे, सुकदेव बाविस्कर यांनी अर्पण व जनरल सलामी दिली.
त्यानंतर *"शौर्य दिवस"* निमित्त विजय स्तंभास व सरसेनापती सिद्धनाक महाराज यांच्या प्रतिमेची पुजन अशोक बाविस्कर, संतोष अहिरे, रविंद्र वाडे यांच्या हस्ते करण्यांत आली. तसेच विजय स्तंभास समता सैनिक दलाचे सेवानिवृत्त मेजर आयु.एस्. व्ही.करंदीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली *समता सैनिक दला तर्फे पथसंचलन करून वीरचक्र अर्पण करूनअभिवादन केले व जनरल सलामी दिली.*
सदर कार्यक्रमास शौर्य दिना बाबत अशोक बाविस्कर,हितेंद्र मोरे, सुदाम करनकाळ यांनी मनोगत व्यक्त केले.चोपडा शहर व तालुक्यातील तमाम बौद्ध उपासक व उपासिका कार्यकर्त,पदाधिकारी,अधिकारी कर्मचारी यांनी अभिवादन करून मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी जिल्हा संघटक हितेंद्र मोरे,तालुकाध्यक्ष बापूराव गिरधर वाणे,शहराध्यक्ष भरत भिमराव शिरसाठ,समता सैनिक दल प्रमुख मेजर शालीग्राम करंदीकर,नगरसेवक अशोक बाविस्कर,रमेश शिदे, सामाजिक कार्यकर्ता संतोष अहिरे,प्रा.मेघराज हांडे,प्रा.नरेंद्र कोल्हे ,प्रा.दिलीप सपकाळे, सुदाम ईशी,रविंद्र वाडे ,सुदाम करनकाळ,भगवान (छोटू) वारडे,सुकदेव बाविस्कर ,संजय अहिरे,सचिन बाविस्कर,भूरसिंग बाविस्कर,दिवाणजी सांळुखे,अनिल वाडे,देवानंद वाघ,रमेश सोनवणे,जानकीराम सपकाळे,संजय साळुंखे,दिपक मेढे,संघपाल सावते,सुनिल शिरसाठ आदी समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुत्रसंचलन शहराध्यक्ष भरत शिरसाठ यांनी केले .