सावित्रीबाई म्हणजे स्री शिक्षणाची ज्योत - मनिषा पाटील

 सावित्रीबाई म्हणजे स्री शिक्षणाची ज्योत - मनिषा पाटील

मनिषा पाटील, दयाराम वाघ, प्रा.सुरेश कोळी,जया महाजन

भडगाव दि.०३(प्रतिनिधी):- सावित्री बाई फुले भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री, भारताच्या पहिल्या मुख्याध्यापिका, क्रातिबा जोतिराव फुले यांची पत्नी त्यांच्या सहवासात व संस्कारात कष्ट केले.वयाच्या दहाव्या वर्षापासून अक्षर ओळख व साक्षर होत दिन दलीत दुबळाचे दुःखात सहभागी होवून मदतीसाठी धावून आली  त्यांच्या संवेदना ह्या आचरणातून व काव्यातुन प्रकट झाले त्यांनी १८५४ मध्ये 'काव्यफुले' हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित केले या नावात फुले हा शब्द एकाच वेळी दोन गोष्टी साध्य करतो तो म्हणजे फुले हे घराण्याचे नाव व वडीलोपार्जित फुलां चा व्यवसाय, सावित्रीचे भाव विश्व फुलांनी बहरून येते काही कविता शिक्षकीपेशा विषयी काव्यातुन महती विशद केली यातील - स्वागत पार पद्य, बोलकी बाहुली, श्रेष्ठ धन, शिक्षणेसाठी जागे व्हा, या काव्यामधुन शिक्षणा चा अर्थबोध घेऊ शकतो" असे विचार मनिषा पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदचे प्रा.सुरेश कोळी होते.

 कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक जया महाजन यांनी तर सूत्रसंचालन कवि दयाराम वाघ यांनी तर आभारप्रदर्शन प्रेरणा माळीने केले कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी रुपाली कोळी,स्नेहल मोरे, दिपीका पवार, मनिषा पाटील, पायल गुरव,धारीनी शिंदे,विजया महाजन लतीका महाजन मॅडम,तेजस्वीनी माळी, हेमांगी माळी,आर्या महाजन,दयाराम वाघ देविदास महाजन  उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा भडगाव व संस्कृती ब्युटी पार्लर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने