राजमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहाने संपन्न
चोपडा,दि.१२(प्रतिनिधी): परिसर सद्गुरु शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्राथमिक कन्या विद्यामंदिर चोपडा या शाळेत आज दिनांक 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरा करण्यात आली.
यावेळी चेतन पाटील व हर्षदा पाटील यांनी बालशिवाजी जिजामाता बनून संवाद नाटिका सादर केली तसेच पूर्वी सोनवणे लावण्या पाटील , स्नेहा परदेशी, मृणाल पाटील , हर्षली मोतीराळे,मानवी पाटील , चेतना चौधरी , देवेंद्र चौधरी , रोहित पाटील,कुणाल पाटील ,लावण्या लोहार , सुजय गाडीलोहर , आकांक्षा साळुंखे, यज्ञा देशमुख यासह इतर विदयार्थी राजमाता जिजाऊ , छत्रपती शिवराय व स्वामी विवेकानंदांच्या वेषभूषा करून कार्यक्रमात सहभागी झाले. विनय पाटील या विद्यार्थ्यांने विवेकानंदाच्या वेशभूषेत मी विवेकानंद बोलतोय ... या विषयावर भाषण देऊन उपस्थिताची मने जिंकली . श्री प्रमोद पाटील यांनी जिजाऊ यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले आणि स्वराज्य घडवण्यात जिजाऊंचा मोलाचा वाटा होता त्यांनी बालपणापासूनच शिवरायांवर संस्कार टाकले व स्वराज्य निर्मितीसाठी प्रेरणा दिली त्यामुळेच रयतेचे राज्य स्थापन झाले .श्री प्रविण पाटील मुख्याध्यापक माध्यमिक विभाग यांनीही विवेकानंद यांचे शिकागो येथील धर्म परिषदेमधील भाषण व त्यांचे तत्त्वज्ञान याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता पाटील तर मुख्याध्यापक गोपाल पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मयुरी गोसावी, सुमिता महाजन कांताबाई पाटील श्रीमती बारी मॅडम यांनी मेहनत घेतली. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक बंधू भगिनी उपस्थित होते.