महापुरुषांचे विचार संस्कार देणारेच-- व्हि. एच. करोडपती

 महापुरुषांचे विचार  संस्कार देणारेच-- व्हि. एच. करोडपती


चोपडा दि.१२(प्रतिनिधी)  येथील कै हि मो करोडपती माध्यमिक विद्यालय येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्सव प्रसंगी पूज्य साने गुरुजी विद्या प्रबोधिनी मंडळ चोपडा चे सचिव श्री आण्णासाहेब व्हि. एच करोडपती यांनी आपले विचार मांडले. राष्ट्रमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराज यांच्यावर चांगले संस्कार केले. स्वतः युद्ध कलेचे व राजनीतीचे शिक्षण दिले . स्वामी विवेकानंद यांच्या विचार आत्मसात केल्यास राष्ट्रभक्ती व   समाजसेवा करण्याची प्रेरणा मिळते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी महापुरुषांचा संस्कारीत विचार स्वतःमध्ये आंगिकरा. महापुरुषांचे विचार चांगले संस्कार देणारेच असतात असे प्रतिपादन त्यांनी केले.


यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इ.१० वी ची विद्यार्थिनी कु. रोशनी ताराचंद पावरा हिने राष्ट्रमाता जिजाउंच्या भूमिकेत एकपात्री सादर केली. याचवेळी मुंबई येथील YMCM या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने व महाराष्ट्र साहित्य परिषद चोपडा यांच्या सहकार्यातून अनाथ, गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सेट देण्यात आले. 

कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री डी व्हि. बाविस्कर, जेष्ठ शिक्षक श्री आर आर बडगुजर, श्री ए पी बड गुजर, श्रीमती व्हि बी साळुंखे, श्रीमती सी पी बडगुजर, श्रीमती एस टी बोरसे,, श्रीमती पी सी बडगुजर, संजोग साळुंखे,अशोक बडगुजर, सुनील बडगुजर व विलास सनेर हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मंगेश भोईटे सर यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने