चोपडा तापी सुतगिरणीच्या उज्वल भविष्यासाठी चेअरमनपदाची माळ पुनः च् माजी आमदार कैलास बापू पाटील यांच्या गळ्यात..व्हा.चेअरमनपदी प्रल्हाद पाटलांची वर्णी
*चोपडा दि.11(प्रतिनिधी महेश शिरसाठ)* :-चोपडा तापी सहकारी शेतकरी सूतगिरणी उभारणीचे शिल्पकार,आधारवड माजी .आ .कैलास बापु पाटील यांची पुनः च् चेअरमनपदी अविरोध निवड करण्यात आली असून व्हा .चेअरमनपदाची माळ प्रल्हाद अप्पा पाटील यांच्या गळ्यात पडली आहे .
यावेळी माजी विधानसभा सभापती अरुणभाई गुजराथी, चोपडा पीपल्स बँक चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी, नगरसेवक हितेंद्र देशमुख, नगरसेवक रमेश शिंदे, नगरसेवक भूपेंद्र भाई गुजराथी, अॅड डी.पी.पाटील, संचालक अमृत आप्पा वाघ, संचालक रमेश नाना पाटील,घन:शामभाई अग्रवाल, सुनील बुरड यांच्या सह सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळ उपस्थित होते.
चोपडा तापी सहकारी सूतगिरणीवर माजी आमदार तथा सुतगिरणीचे माजी चेअरमन बापूसाहेब कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखालील महा विकास आघाडीने २१ च्या २१ जागांवर विजय पटकावत भाजपा प्रणीत सुतगिरणी बचाव पॅनलचा धुव्वा उडविला होता.सुतगिरणीचे पाते थांबू न देता गिरणी प्रगतीपथावर आणण्यासाठी कैलास बापू पाटील हे अहोरात्र मेहनत घेत असल्याने त्यांच्या च गळ्यात चेअरमनपदाची माळ टाकतं सुतगिरणीचे उज्वलतेची धुरा त्यांच्या हाती सोपवली आहे.