अखिल भारतीय तैलिक साहू महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची तिसऱ्यांदा निवड
चोपडा,दि.११(प्रतिनिधी): अखिल भारतीय तैलिक साहू महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड नुकतीच उज्जैन येथे तेली समाजाच्या अधिवेशनात करण्यात आली. देशातील जवळजवळ 24 राज्यातील प्रदेशाध्यक्ष ,प्रतिनिधी व आजीवन सदस्यांनी महासभेत हजेरी लावली .
यावेळी महाराष्ट्रातर्फे प्रदेशाध्यक्ष श्री विजय भाऊ चौधरी, महिला अध्यक्ष प्रियाताई महेंद्र, महासचिव अशोक चौधरी, विजय काळे ,विजय संकपाळ, संकपाळ बंधू, युवक कार्याध्यक्ष श्यामकांत इसी, नगर जिल्हाध्यक्ष एकनाथ हरी नागले, जळगाव जिल्हाध्यक्ष के .डी. चौधरी, विभागीय अध्यक्ष अशोक चौधरी, जयदत्त अण्णा यांचे खांदे समर्थक प्रशांत शिंदे जामखेडकर, ज्ञानेश प्रसाद ,नंदुरबार जिल्हाध्यक्ष संदीप चौधरी, धुळे जिल्हाध्यक्ष नरेंद्र चौधरी, देवकांत चौधरी, महेंद्र चौधरी ,भंडारा जिल्हाध्यक्ष सुरेश धुर्वे ,माजी खासदार सुरेशजी वाघमारे ,अशोक संकपाळ, अरविंद दारुणकर, विजय रत्नपारखी, ठाणे जिल्हाध्यक्ष खंडू चौधरी, एस एम चौधरी, गुजरात प्रदेशाध्यक्ष एन.टी. राठोड ,मध्य प्रदेश प्रदेशाध्यक्ष ताराचंदजी साहू, ओमप्रकाश जी साहू, सौ आभा साहु , राजस्थान प्रदेशाध्यक्ष शौकिनचन्द साहू, प्रकाश महिन्द्रे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
आपल्या सत्काराला उत्तर देताना राष्ट्रीय अध्यक्ष श्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले समाजाचा सर्वांगीण विकास करत असताना समाजाला राजकारणात लोकसंख्येच्या प्रमाणात स्थान मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. समाजात राजकारण न येऊ देता विविध पक्षांमध्ये समाजाला योग्य ते स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील्. समाजाचं राजनैतिक महत्त्व अधोरेखित केले जाईल. समाजाचे संघटन आहे त्यापेक्षा अधिक मजबूत करण्याचा संकल्प यावेळी करून ज्यांनी समाजासाठी योगदान दिले अशा सर्वांना बरोबर घेऊन युवक व महिलांना सर्वच क्षेत्रात योग्य ते स्थान करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी समाज बांधवांना दिला. या अधिवेशनाची जबाबदारी पार पाडल्या बद्दल प्रदेशाध्यक्ष श्री ताराचंद साहू व त्यांच्या सर्व सहकारी समाज बांधवांचे प्रदेश तेली महासंघाचे अध्यक्ष श्री के.डी. चौधरी अशोक चौधरी व प्रशान्त शिन्दे अन्य समाज बांधवांनी अभिनंदन केले.