चोपडा येथे बाळासाहेबांच्या शिवसेनेचा जल्लोष फटाके फोडून आनंद साजरा

 चोपडा येथे बाळासाहेबांच्या शिवसेनेचा जल्लोष फटाके फोडून आनंद साजरा 

चोपडा दि.१५(प्रतिनिधी) :येथील आमदार लताताई सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांच्या ऐवजी आपल्याला आमदार घोषीत करावे म्हणून जगदीश वळवी यांनी दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळून लावल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. याचा येथील बाळासाहेबांच्या शिवसेनेने जल्लोष करीत आनंद साजरा केला. 

     १५ रोजी सकाळी दहा वाजता बाळासाहेबांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर एकत्र होत छत्रपति शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून फटाके उडवून जल्लोष साजरा केला. तसेच  माजी आमदार  प्रा. चंद्रकांत सोनवणे व आमदार लताताई सोनवणे, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या घोषणा देत एकमेकांना पेढा भरवीत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा करण्यात केला. 

    यावेळी माजी पंचायत समिती उपसभापती एम. व्ही. पाटील, सुकलाल कोळी, रावसाहेब पाटील धुपे, गणेश पाटील मालखेडा, सागर ओतरी, माजी नगरसेवक विकास पाटील, पि. आर. माळी, गणेश पाटील, नितीन पाटील, नरेंद्र पाटील, ऍड शिवराज पाटील, प्रदीप बारी, मंगल कोळी कोळंबा , गोरख कोळी, चंद्रकांत कोळी गोरगावले, प्रताप पाटील धनवाडी, नितीन चौधरी, किरण पाटील, रोहिदास कोळी, मुकेश कोळी कठोरा, भास्कर पाटील, कैलास बाविस्कर लासुर, धिरज धनगर, किशोर पाटील, दिपक पटाईत, चंदू वाघ, निलेश महाजन, विलास महाजन, विनोद महाजन, जितेंद्र शेटे, संजय महाजन, महेंद्र माळी, जितेंद्र माळी, देवा कोळी, सोमनाथ पाटील आडगाव, घनश्याम निळे, विश्राम तेले, महेंद्र राजपूत, नंदू गवळी, संदीप पाटील भारडू, गोलू मराठे, यांचे सह शिवसेनेचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने