महाजन इंग्लिश क्लासेस १० वी साठी' उदबोधन वर्ग संपन्न
चोपडा दि.१६(प्रतिनिधी): शिक्षक-पालक सभा बहुतांश शाळेत साजरा होत असतात परंतु महाजन इंग्लिश कलासेस दरवर्षी पालकांच्या हितगुंज सभा आयोजीत करते त्याचाच भाग म्हणून नुकताच १० वी च्या विदयार्थ्यांचे पालकांसाठी' उदबोधन सभेचे आयोजन करण्यात येऊन विध्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढवली जाते यांवर खास चर्चा होऊन मार्गदर्शन करण्यात आले.
क्लासेसचे संचालक श्री दिपक महाजन सरांनी विध्यार्थाना ग्रामर टिप्स तसेच पेपर पॅटर्न यावर विशेष भर दिला. 'practice makes man perfect था उक्तीने विदयार्थ्यांनी जास्तीत जास्त पेपर सोडवावा त्यामुळे टाईम मैनजमेट कळते. तसेच पालकांच्या हस्ते "no vision - No Success लिखीत स्वरूपात देवून गुणवत्ता वाढ अभियान समोर ठेवले. आतापर्यंत क्लासेसचे विद्यार्थी नाशिक विभागात इंग्रजी विषयात प्रथम आले आहेत. यावेळी डॉ. विनित हरताडकर , सौ.निताताई हरताळकर ,. डी.जे पाटील सर
शुभांगाताई भोईटे मॅडम , गोपाल माळी, बडगुजर सर आदी उपस्थित होते.