जिल्हाधिकाऱ्यांकडून दिव्यांग,वृध्द,निराधाराच्या मागण्यांची दखल.. तूर्त आंदोलन स्थगित चंपतराव डाकोरे पाटिल

 

जिल्हाधिकाऱ्यांकडून दिव्यांग,वृध्द,निराधाराच्या  मागण्यांची दखल.. तूर्त  आंदोलन स्थगित चंपतराव डाकोरे पाटिल


नांदेड दि.२६(प्रतिनिधी) जिल्ह्यात दिव्यांग ,वृध्द, निराधार यांच्या पंधरा  प्रश्नासाठी तेरा निवेदन व आंदोलन करुन न्याय तर मिळत तसेच नाहि साधे उत्तर ही मिळत नसल्यामुळे दि.२७डिसें.२०२२ पासुंन जिल्हाअधिकारी कार्यालय नांदेड येथे  न्याय मिळेपर्यत  बे-मुधत धरणे  आदोलन  दिव्यांग वृध्द, निराधार,मित्र मंडळ महाराष्ट संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेत्रत्वात करण्यात आले. जिल्हाधिकारी साहेब नांदेड निवेदनाद्वारे धरने आंदोलनाचे निवेदन दिले असता त्या निवेदनाची दखल तात्काळ नांदेड  जिल्हाधिकाऱ्यांनी २९ डिसेंबर

 २०२२ला  बैठक आयोजित करून सर्व पंधरा प्रश्न संबधित अधिकाऱ्यासोबत चर्चा करुन सोडविण्याचे लेखि अश्वासन व आंदोलन मागे घेण्यासाठि लेखि निवेदन जिल्हाअधिकारी, व  समाजकल्याण अधिकारी यांनी लेखि  कळविल्यामुळे दि.२७ डिसेंबर २०२२ चे  धरने आंदोलन तात्पुरते रध्द  स्थगित करण्यात आले असुन दि.२९ डिसे.२०२२ च्या खालिल बैठकित योग्य ते निर्णय नाहि झाल्यास पुढील आंदोलनाची तारीक कळविण्यात येईल असे प्रसिध्दी पत्र  संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल, जिल्हाअध्यक्ष ज्ञानेश्वर नवले, जिल्हा स.प्रमुख नागोराव बंडे,जि.ऊपअध्यक्ष राजुभाऊ शेरकुरवार, जिव्हा सचिव अनिल रामदिनवार, वकिल आघाडीचे सरबिजीतसिंग, तेजपालसिंग, सविता गच्चे तुळशिराम दुधकवडे,काळबा सातपुते, शिवाजी आबादार ईत्यादी असे प्रसिध्दीपत्रक दिले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने