पंकज इंग्लिश मिडियम स्कूल रिमझिम स्नेहसंमेलन जल्लोषात
चोपडा,दि.२६ (प्रतिनिधी):-पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित पंकज इंग्लिश मिडीयम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन रिमझिम जल्लोषात साजरा करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेश बोरोले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी शिक्षण विस्तार अधिकारी सौ. वंदना बाविस्कर ,सुधाकर गजरे, दिपक पाटील ( केंद्रप्रमुख ) उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक पंकज बोरोले, गोकुळ भोळे, सौ हेमलता बोरोले, दिपाली बोरोले, पंकज कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य आर आर अत्तरदे, पंकज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्हि.आर पाटील , पंकज प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.व्हि.पाटील , पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलचे प्राचार्य मिलींद पाटील , बाल संस्कार केंद्राच्या विभाग प्रमुख सौ. रेखा पाटील उपस्थित होते.
संस्थेच्या परंपरेनुसार समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या डॉ. महेंद्र पाटील, सौ. चंद्रकला चव्हाण, ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हा संघटक प्रमोद डोंगरे ,माजी मुख्याध्यापक व चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाचे तालुकाध्यक्ष विजय करोडपती , NSG कमांडो नितीन धनगर, महेंद्र माळी ,चोपडा तालुक्यातील आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त बापू कोळी या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
'रिमझिम 2022' हा कार्यक्रम बेटी बचाओ, बेटी पढाओ या थीमवर विद्यार्थ्यांनी नाटिका व नृत्यविष्कार सादर केले. पंकज इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्राचार्य गणेश साळुंखे यांनी शाळेचे प्रास्ताविक सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सौ. अनिता पाटील व सौ. सुनिता सैंदाणे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. रविना भादले यांनी केले. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक - शिक्षीका कु. तस्निम शेख, सौ.शितल भावसार, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या विभाग प्रमुख सौ. रंजना तायडे ,प्रतिक चौधरी , कु. वर्षा पाटील, नितीन बाविस्कर, अनिल पावरा,राहुल पावरा, सौ. रुफीना भादले, सौ. स्वप्नाली पाटील, दिनेश पाटील, शिक्षकेतर कर्मचारी रविंद्र महाजन, बाळू पाटील, श्रीमती सुलभा पाटील, परेश पाटील यांनी अनमोल सहकार्य केले.....