ग्राहक बाजारातील राजा होय-श्री.डि.बी.कोळी

 ग्राहक बाजारातील राजा होय-श्री.डि.बी.कोळी 


  भडगाव दि.२६(प्रतिनिधी) | ग्राहक दिनाची सुरूवात दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आपल्याला कायद्याने ग्राहक संरक्षणा साठी सहा मूलभूत घटक व हक्क दिले आहेत. त्याचा ग्राहक म्हणून आपण सदुपयोग केला पाहिजे. राष्ट्रीय ग्राहक दिन जागतिक ग्राहक दिन , ग्राहक दिनाचे महत्त्व आदीबाबत सखोल मार्गदर्शन संस्कृती फाऊंडेशनचे संचालक श्री डी. बी. कोळी सर यांनी केले. यावेळी विद्यार्थी, ग्राहक, दुकानदार व नागरिकांना त्यांनी विविध उदाहरणे देऊन कायद्याबाबत मार्गदर्शन केले  आपल्या हक्काची जाणीव करून दिली तर अध्यक्षीय भाषणात बोलतांना तहसील दार मुकेश हिवाळे यांनी संगणक मोबाईल फोन वापरताना ही  इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून होणारे संभाव्य सायबर गुन्हे टाळण्याची दक्षता घ्यावी,तसेच आपण दुकानात गेल्यावर  नियमित सजगता ठेवली फसवणूक टाळता येईल असे मत तहसीलदार मुकेश हिवाळे यांनी व्यक्त केले. आगामी जागतीक ग्राहक दिवस ही मोठ्या संख्येने जनजागृती करून साजरा करण्याच्या सूचना दिल्या.  हा कार्यक्रम आज दी २४ डिसेंबर सकाळी ११ वाजता येथिल शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय ग्राहकदिनानिमित्त आयोजीत करण्यात आला. त्यात ते बोलत होते. 

यावेळी निवासी नायब तशिलदार रमेश देवकर, पुरवठा निरीक्षक ज्ञानेश्वर अमृतकर , रावसाहेब कांबळे प्राचार्य सुरेश रोकडे,ज्योती पाटील भूमी अभिलेख अधिकारी मनोहर पाटील पंचायत समितीचे देवेंद्रपाटील वैद्यमापक अधिकारी अरविंद जगताप पत्रकार नरेंद्र पाटील, संजय पवार, निलेश महाले,ग्राहक कल्याण फाॅऊडेशनचे दिनेश महाजन , राजेश पाटील वंदना महाजन, ईश्वर बाविस्कर बाळकृष्ण वाणी , बंटी पाटील परमेश्वर पाटील नागो पाटील आदी स्वस्त धान्य दुकानदार उपस्थीत होते यावेळी वैद्य मापक अधिकारी अरविंद जगताप यांनी ग्राहक तक्रार निवारण व वजन माप याबाबत मार्गदर्शन केले. तसेच वजनाच्या खालील बाजूस लावलेला होलो ग्राम, पॅकिंग पिशव्यांचे दिनांक, वजन तपासून पाहण्याचे आवाहन केले. दरम्यान राजेश पाटील सर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सुरेश रोकडे, सूत्रसंचलन, नरेंद्र पाटील तर आभार नायब तहसीलदार रमेश देवकर यांनी व्यक्त केले.कार्यक्रमास नागरीक, ग्राहक, विद्यार्थी, स्वस्त धान्य दुकानदार, महसूल व पुरवठा कर्मचारी अधिकारी आदी उपस्थीत होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने