चोपडा तापी सहकारी सूतगिरणीवर माजी आमदार कैलास बापू पाटील यांचे वर्चस्व कायम..महाविकास आघाडीच्या हेलिकॉप्टर ची गगन भरारी ..२१ च्या २१ जागांवर विजयी पताका लहरली
चोपडा दि.२६(प्रतिनिधी महेश शिरसाठ) :- चोपडा तापी सहकारी सूतगिरणीवर माजी आमदार तथा सुतगिरणीचे माजी चेअरमन बापूसाहेब कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखालील महा विकास आघाडीने २१ च्या २१ जागांवर विजय पटकावत भाजपा प्रणीत सुतगिरणी बचाव पॅनलचा धुव्वा उडविला आहे.सुतगिरणीचे पाते थांबू न देता गिरणी प्रगतीपथावर आणण्यासाठी कैलास बापू पाटील यांनी अहोरात्र केलेली मेहनत या निवडणुकीत काम करून गेली अशी जोरदार चर्चा मतदारातून होत आहे.
चोपडा तापी सहकारी सूतगिरणीची व्यवस्थापन समितीची पंचवार्षिक निवडणूक सन २०२२ ते २०२७ साठी आज मतमोजणी प्रक्रिया शहरांतील आनंदराज पॅलेस येथे शांततेत पार पडली. कापुस उत्पादक शेतकरी मतदार संघ प्रतिनिधी (१५), अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी (०१) महिला प्रतिनिधी (०२), इतर मागासवर्गीय प्रतिनिधी (०१), भटक्या विमुक्त जाती/जमाती/विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी (०१), बिगर कापुस उत्पादक शेतकरी मतदार संघ प्रतिनिधी (०१) अश्या एकूण २१ जागांसाठी लढत झाली. तब्बल ५३ उमेदवार आपले भवितव्य अजमावत होते.त्यात महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष
अशी सरळ लढत झाली तर ११ उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. महा विकास आघाडीला हेलिकॉप्टर चिन्ह मिळाले होते भारतीय जनता पार्टी यांना रोड रोलर हे चिन्ह मिळाले होते तर अपक्षांना वेगवेगळ्या प्रकारची चिन्ह देण्यात आली होती.
सदर निवडणूकीत सहकार पॅनलने सर्वच्या सर्व २१ जागांवर विजय मिळवत सूतगिरणी बचाव पॅनलचा अक्षरशः धुव्वा उडविला. त्यात अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे. सदर निवडणूकीत मंत्री गिरीश महाजन यांनी वेळोवेळी लक्ष घातले तरी देखील त्यांच्या पॅनलला भोपळा फोडता आला नाही. तापी सहकारी सूतगिरणी निवडणुकीचा विजय हा धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा असल्याचे माजी आमदार व तापी सहकारी सूतगिरणीचे माजी चेअरमन कैलास पाटील म्हणाले...