जेष्ठ कलाशिक्षक भगवान भावसार यांचे शिग्र रेखांकनावर व बासरी वादनावर प्रात्यक्षिक* .

 जेष्ठ कलाशिक्षक भगवान भावसार यांचे शिग्र रेखांकनावर व बासरी वादनावर प्रात्यक्षिक 


  चोपडादि.२६(प्रतिनिधी) -  भगिनी मंडळ चोपडा संचलित, ललित कला केंद्र चोपडा येथील प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष च्या विद्यार्थ्यांसाठी शेंदुर्णी येथील जेष्ठ कलाशिक्षक भगवान भावसार यांनी रेखांकन व बासरी वादनाची ओळख करून देत प्रात्यक्षिक दिले.

कोणतीही कला मनापासून जोपासली तर यश मिळतेच चित्रकलेतील व्यक्ती चित्रासाठी छाया व प्रकाश बघून काम केले तर आपोआपच चित्र तयार होते. भावसार यांनी मुंबई महानगरपालिकेतील शाळेत 33 वर्ष कला शिक्षक म्हणून सेवा केली असून सुप्रसिद्ध कॅलेंडर आर्टिस्ट रघुवीर मुळगावकर यांचे कडे अनेक दिवस त्यांनी काम केले आहे. तसेच चित्रकार इलमेलकर व अब्दुल रहीम आप्पा भाई यांचे त्यांना अनमोल सहकार्य ही लाभले आहे त्यांनी स्केचिंग सोबतच सायकलिंग चा छंदआजही 75 च्या वयात जोपासला असून ते रोज किमान चार ते पाच व्यक्ती चित्रण स्केचेस करतात. सुप्रसिद्ध बासरी वादक पन्नालाल घोष यांची शिष्य हरिपथ चौधरी यांचे कडे त्यांनी बासरीचे धडे घेतले असून रोज सराव करतात.

बासरी व बासरी चे प्रकार यावर विद्यार्थ्यांना सखोल माहिती देत सुरांची ओळख करून दिली.यावेळी प्रा.पांडव उपस्थित होते.

 यावेळी प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी त्यांचा सत्कार केला  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संजय नेवे यांनी केले तर यशस्वीतेसाठी प्रा. विनोद पाटील व प्रा. सुनील बारी यांनी सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने