वैजापूरच्या तेल्या घाटातील रस्ता वाहून गेल्याने अपघातास आमंत्रण..
चोपडा,दि.२७ (प्रतिनिधी)*:- तालुक्यातील बोरअजंटी ते वैजापूर दरम्यानच्या तेल्या घाटातील संरक्षण भिंती जवळील रस्ता पावसाळ्यात वाहून गेल्याने रस्त्याच्या एका बाजूस मोठा कडा तयार झालेला आहे. अजुनही याकडे संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. याठिकाणी टू व्हीलर, लहान फोर व्हीलर, बैलगाडी रस्त्यावरून घसरून किरकोळ अपघातही झालेले आहेत. या रस्त्यावरून तालुक्यातील उत्तर भागातील व मध्य प्रदेशातून येणारे जाणारे हज्जारो वाहनांची चोविस तास वर्दळ सुरू असते. लहान मोठे वाहन पास करतांना चालकांना आपला जीव मुठीत धरूनच वापरावे लागते. संबंधित विभागाने वेळीच याठिकाणी माती रेती खडी डांबर टाकुन रस्ता मजबूत केला पाहिजे. अन्यथा या ठिकाणी भविष्यात मोठा अपघातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची असेल. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी सामा. कार्यकर्ते मधुसूदन बाविस्कर (चोपडा) यांनी ह्या पत्रकांवर केली आहे.